AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर कापूस फेकला, आंदोलक झाडावर… कर्जमाफीचं आंदोलन पेटलं; विधानभवनाबाहेर तुफान राडा

रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने महायुती सराकारच्या कर्जमाफीवर आक्षेप घेतला आहे. कर्जमाफी फसवी असल्याचं म्हणत विधानसमोर आंदोलन केलं.

रस्त्यावर कापूस फेकला, आंदोलक झाडावर... कर्जमाफीचं आंदोलन पेटलं; विधानभवनाबाहेर तुफान राडा
| Updated on: Jul 09, 2026 | 11:40 AM
Share

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली.  कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. परंतु या कर्जमाफीवर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील क्रांतीकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला. ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हणत विधानभवनाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस फेकत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस आणि धान्य फेकले. तर काहींनी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन केल. या आंदोलनंतर पोलिसांनी आक्रमक आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी रविकांत तुपकर देखील होते. पोलिसांनी तुपकर यांच्यासहित कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेले.

रविकांत तुपकार म्हणाले, ‘आज आम्ही सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. आमचा गुन्हा काय आहे, तर आमच्या बापाच्या घामाचा जाब विचारत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की, ही शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. या कर्जमाफीत जाचक अटी आणि निकष घातले आहेत. त्यामुळे 10 ते 15 टक्के शेतकरी कर्जमाफीत बसणार नाहीत. या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा. शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा द्या. या मागण्याची सरकार दखल घेत नाही. यासाठी मंत्री गिरीश महाजन बैठक लावतो असे म्हणाले. परंतु त्यांनी अद्याप बैठक लावलेली नाही.

‘शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. आज विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही गांधींच्या मार्गाने आलो. उद्या आम्ही भगतसिंग यांच्या मार्गाने चाल करून येऊ. जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. हे सरकार क्रूर आहे .शेतकऱ्यांसाठी फासावरही जाण्याची तयारी आहे, असे तुपकर पुढे म्हणाले.  दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर झाडावर चढून आंदोलन केले. झाडावरून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर या शेतकऱ्यांना खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले.  कार्यकर्त्यांनी झाडावर चढून आंदोलन केल्याने पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची तारंबळ उडाली.  आंदोलक झाडावर चढले. जोपर्यंत फडणवीस येऊन आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत झाडावरून उतरणार नाही, अशी आक्रमक भूमिका झाडावर चढलेल्या आंदोलकांनी घेतली आहे. तर या आंदोलकांना झाडावरून खाली आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा