AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट, 5 जिल्ह्यांना थेट इशारा, घराच्या बाहेर पडणे टाळा, पुढील 24 तास…

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिलाय. आज काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यावर मोठं संकट, 5 जिल्ह्यांना थेट इशारा, घराच्या बाहेर पडणे टाळा, पुढील 24 तास...
Rain
| Updated on: Sep 27, 2025 | 7:54 AM
Share

राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून मोठे नुकसान पिकांचे झाले. मात्र, पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवांमान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पुणे, जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय.

पुण्याच्या घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झालीये. अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे जालना जिल्हातील शेतांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पाऊस पडताना दिसत आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जालना जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यामुळे जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. या पावसात भूम परंडा परिसरातील नळी, दुधना, बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुन्हा नद्या धोक्याच्या पातळी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...