AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! दुपारी घराबाहेर निघणे धोकादायक, 12 ते 4 शक्यतो..

भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

सावधान! दुपारी घराबाहेर निघणे धोकादायक, 12 ते 4 शक्यतो..
heat
| Updated on: Mar 28, 2026 | 7:13 AM
Share

राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामध्येच काही जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवसात उष्णता वाढण्याचे दाट संकेत आहेत. भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाचाही येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. परभणी, ब्रह्यपुरी, वर्धा, अमरावती आणि अकोला येथे पारा 40 च्या पार जाताना दिसला. सोलापूर, वाशिम येथे 39 अंशाच्या आसपास तापमान नोंदवले गेले. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती हीच राहण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाबाहेर पडताना काळती घ्यावी. अती महत्वाचे काम असल्याशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा. गडचिरोली, गोदिंया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल.

मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत मराठवाड्यातील काही भागात हजेरी लावताना दिसत आहे. आज मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे बघायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा काही भागात हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. सतत पाऊस कोसळत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

अकोल्यात गेल्या नऊ दिवसांपासून 36 ते 39 अंशांदरम्यान स्थिर असलेले तापमान अचानक वाढले असून पारा 41.08 अंशांवर पोहोचला होता. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारी रस्त्यांवरही मोठा सुकसुकाट बघायला मिळाला. नागरिका उन्हात घरात राहणे पसंत करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली, शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. उन्हाचा तीव्र कडाका सुरू असतानाच वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला आणि दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या कांदा आणि गहू काढणीचा हंगाम सुरू असताना या अनपेक्षित पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?