AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट गारपिटीसह…

गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील पावसाचे संकट काही जाण्याचे नाव घेत नाही. पुढील दोन दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत.

29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच, थेट गारपिटीसह...
Heavy rain
| Updated on: Mar 29, 2026 | 2:10 PM
Share

हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस होताना दिसत आहे. मध्ये दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी वाऱ्यासह पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आज राज्यातील अनेक भागात थेट वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासोबतच सतत हवामानात बदल होत असल्याने आंब्याचे पिकही धोक्यात आहे. मार्च महिन्यात पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे अगोदरच रब्बी पिकाचे नुकसान झाले. काही भागात पाऊस तर काही भागात उष्णता अशी स्थिती सध्या आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार जात आहे. आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. मुंबईमध्ये आज सकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळाले.

भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाच अंदाज आहे. उद्यापासून राज्यात पावसासाठी अधिक पोषक वातावरण असणार आहे. लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याचा अंदाज आहे. वाशिम, धुळे, चंद्रपूर, नागपूर, ब्रह्यपुरी या जिल्ह्यांमध्ये काल 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवले गेले. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 29, 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम असेल. अमरावती येथे 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सतत पाऊस आणि गारपिट होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

रत्नागिरी गेल्या दोन दिवसांपासून बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम हापूस आंब्यावर झाला. तयार झालेला हापूस आंब्याची गळ वाढली आहे. यावर्षी केवळ रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे प्रमाण दहा टक्के आहे. सकाळी थंडी आणि दुपारनंतर तापमान वाढ यामुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. आंबा भाजून काळा पडून तयार झालेला आंबा गळून पडतोय. ज्या हंगामात आंब्याची तोडणी करायची त्या हंगामात आंब्यावर फवारणी करावी लागत आहे. आंब्याचं मोठं नुकसान, आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

पुढील चार दिवसात राज्याच्या कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही,त्यानंतर दोन ते तीन अंशाने हळूहळू घट होईल अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात 30 मार्च रोजी पावसाची शक्यता असून कोकण प्रांत,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी मेघर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Follow Us
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...