AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून महिन्याभरापूर्वी गायब झालेला पाऊस अचानक का सुरू झाला? आक्राळविक्राळ कोसळण्याचं कारण काय? सर्वात मोठी अपडेट समोर

Maharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. फक्त मुंबईच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पावसाने हजेरी लावलीये.

मुंबईतून महिन्याभरापूर्वी गायब झालेला पाऊस अचानक का सुरू झाला? आक्राळविक्राळ कोसळण्याचं कारण काय? सर्वात मोठी अपडेट समोर
Rain
| Updated on: Sep 15, 2025 | 11:46 AM
Share

मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस कमी झाल्याचे चित्र होते. मुंबईमध्ये तर महिन्याभरानंतर अतिमुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मुंबईसह, पुणे आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अचानक महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे मोठे कारण हे पुढे आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचे मोठे कारण असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात पाऊस कोसळतोय. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून जारी करण्यात आली आहे.

मुंबई आणि उपनगरसह विदर्भ, कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे. हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्याला आज सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण आहे. संभाव्य अलर्ट लक्ष्यात घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

कोकणात पुढील चार दिवस पाऊस कोसळणार आहे. रात्रीपासून कोकणात ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी मात्र पावसाची विश्रांती बघायला मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काही भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस असणारा आहे.

पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय तर पुण्याचा घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सहा मंडळात झाली अतिवृष्टीची नोंद;अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...