मोठं संकट, 9, 10, 11 आणि 12 नोव्हेंबरला या राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, अलर्ट जारी, पुढील 48 तास धोक्याची…
Maharashtra Rain Update : राज्यासह देशाचे वातावरण सध्या पूर्णपणे बदलले आहे. काही राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे तर काही ठिकाणी अजूनही पाऊस हजेरी लावताना दिसतोय. यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

एकीकडे पावसाचा इशारा असतानाच दुसरीकडे राज्यात थंडी वाढताना दिसतंय. पावसाने मागील दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल जाणवत आहे. मात्र, पावसाचे ढग राज्यावर कायम आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील 6 दिवसांत देशातील काही राज्यांमध्ये मध्यम पाऊस आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाने थैमान घातले. देशातून मॉन्सून गेला. मात्र, पाऊस असूनही सक्रिय आहे. नोव्हेंबर महिन्याची 9 तारीख आली असतानाही पाऊस कायम आहे. राज्यात काही भागात पारा 14 अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील ६ दिवसांत देशातील काही राज्यांमध्ये मध्यम पाऊस आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मोठे वादळही येईल. जर पुन्हा पाऊस झाला तर परत थंडी कमी होईल, असा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरातील समुद्रसपाटीपासून 1.6 ते 3.1 किलोमीटर चक्राकार वारे कायम आहे. नाशिक, महाबळेश्वर, निफाड, वाशिम या ठिकाणी किमान तापमानाचा पारा 14 अंशांच्या खाली घसरल्याचे गारठा वाढला. पुढील काही दिवसांपासून वातावरण जर असेच राहिले तर पारा अजून खाली जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 9 आणि 12 आणि 13 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये बहुतेक ठिकाणी आणि 9 नोव्हेंबर रोजी केरळ येथे हलका ते मध्यम पाऊस होईल.
9 आणि 10 नोव्हेंबर दरम्यान राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. देशातील वातावरण पूर्णपणे बदलल्याचे सध्या बघायला मिळतंय. काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये चक्क भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय.
थंडीच्या दिवसातही पाऊस होतोय. भर दिवाळीमध्येही यंदा पाऊस पडताना दिसला. दरवेळी दिवाळीमध्ये कडाक्याची थंडी असते. वातावरण बदलल्याचे दिसतंय. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला देखील पाऊस सतत हजेरी लावत होता. मात्र, आता पारा घसरताना दिसत आहे. मात्र, देशातून पूर्णपणे अजूनही पावसाचे ढग गेले नसल्याचे भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्याहून दिसत आहे.
