राज्यावर 5 दिवसांचे संकट! तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये इशारा, प्रशासनाने नागरिकांना…
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर पावसाचं मोठे संकट बघायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा प्रशासनाने मोठा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसतोय. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण असून राज्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

मुंबईसह कोकण-विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. राज्यभरात पुढील पाच दिवस पावसासह वादळी वाऱ्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा. रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूरसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसतोय. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण असून राज्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले मुंबईकर आणि पर्यटक पावसाचा आनंद घेताना दिसले. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असला तरी अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याचं मुंबईतील अनेक भागात दिसून येत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन देखील केले जात आहे. मरगा तालुक्यातील मुरूम परिसरात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली.
पहाटेपर्यंत पडलेल्या पावसाने मुरूम करांची चांगलीच दाणादाण उडाली. अनेक सखोल भागात पाणी साचले तर काही घरात पावसाचे पाणी शिरले. पावसाने सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. पुण्यात वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी-खोकला, अतिसार यांसह नवजात बालकांमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ चा संसर्ग वाढत असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. सततच्या पावसामुळे संसर्गजन्य आजार वाढली आहेत. पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय.
