AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात…

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचे बघायला मिळतंय. आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे बघायला मिळतंय. सकाळीच सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

राज्यावर मोठं संकट! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात...
heavy rain
| Updated on: Aug 25, 2025 | 7:31 AM
Share

राज्यात मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी पूर आले तर शेती पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता कुठे पावसापासून दिला मिळाला असतानाच आता परत एकदा पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच मध्य प्रदेशमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. पुढील दोन दिवसात राज्यात परत एकदा पावसाचा जोर असेल.

कोकण आणि मराठवाड्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी लातूर,नांदेड, हिंगोली आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. बाकी उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईमध्ये आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसत आहेत. सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

25 तारखेला मुंबईमध्ये अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला होता. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. सकाळच्या पावसामुळे शाळेला निघालेल्या मुलांची आणि पालकांचीही तारांबळ उडाली आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये 15 ऑगस्टला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. सकाळी चार वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. काही तासांच्या पावसामध्येच रस्त्यांना पावसाचा स्वरूप प्राप्त झाले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा थेट परिणाम हा मुंबईच्या लोकल सेवेवर झाला होता. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रशासनाकडून सध्या पावसाचा जोर पाहता उपायोजनांना सुरूवात करण्यात आलीये.

Follow Us
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...