पुढील 24 तास संकटाची, पावसाचा हाहाकार, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
Maharashtra Rain Update : अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झालीये. मुंबईमध्ये सायल सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. राज्यात रात्रभर पावसाचा हाहाकार हा बघायला मिळाला. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा दिला आहे.

पावसाने मागील काही दिवसांमध्ये दांडी मारल्याचे चित्र होते. आता देशभरात पाऊस धुवाधार दिसतोय. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. हेच नाही तर आज महाराष्ट्रातातील काह भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र अनेक भागांमध्ये आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळी पावसाला सुरूवात झालीये. आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते, त्यादेखील भागात आज पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे
भारतीय हवामान विभागाकडून रायगड, कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे नागरिकांनी आज फार अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणे अधिक सुरक्षित आहे. राज्यातील इतर भागांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. भारतीय हवामान विभागाकडून कोकणात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत पावसाचा हाहाकार सुरू असून दादर वेस्ट परिसरात झाड कोसळले आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाच्या सरी. रात्री 2 वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तत्काळ येत झाड बाजूला करत रस्ता केला मोकळा. मुंबईसह उपनगरात पहाटेपर्यंत 400 मिलिमीटरहून अधिकचा पाऊस. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा तुंबई झालीये. अंधेरी सबवे मध्यरात्री बंद, तर पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येत सबवेतील पाण्याला दिली काढून दिली वाट.
भारतीय हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट. मुंबई उपनगरात पहाटेपर्यंत दीडशेहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायन्स किंग सर्कल पाण्याने भरलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईस्टर्न हायवे जलमय. पाणी भरल्यामुळे वाहन रस्त्यातच बंद पडली. विरार रात्रभर पडणाऱ्या पावसाने सकल काही भागात पाणी साचले आहे तर भूमिगत गटार ही चेंबर मधून ओहरफ्ल्यू झाले आहेत.
सकाळच्या वेळेत ही पावसाची रिमझिम सुरूच असून, आभाळ पूर्णपणे भरलेले आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसाचा लोकल ट्रेन वर मात्र कोणताही परिणाम झाला नसून, विरार वून चर्चगेट जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत. विरार पूर्व मनवेल पाडा तलाव जवळी चेंबर ओहरफ्ल्यू होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. दादर स्टेशनच्या वेस्टर्न साईडवरील प्लॅटफॉर्म नंबर पाचवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या पटरीवर पाणी भरले आहे. या प्लॅटफॉर्मवरून दादर ते विरार दिशेने गाड्या सुटतात, मात्र पाण्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील जनकल्याण सोसायटीच्या आवारात लँड्स स्लाईड झालाय. या घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले.
