AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर मोठं संकट, हवामान खात्याचा थेट अलर्ट, पुढील 5 दिवस धोक्याची…

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाकडून मोठा अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनाही सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणात आज जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी राजा चिंतेत होता. आता परत एकदा पाऊस हजेरी लावताना दिसतोय.

राज्यावर मोठं संकट, हवामान खात्याचा थेट अलर्ट, पुढील 5 दिवस धोक्याची...
rain maharashtra
| Updated on: Aug 14, 2025 | 8:41 AM
Share

ऑगस्ट महिन्यांच्या सुरूवातीला पाऊस कमी झाल्याचे चित्र राज्यात होते. आता परत एकदा पावसाने जोर धरलाय. काल काही भागात पावसाने हजेरी लावलीये. हवामान विभागाकडून 13 ते 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावलीये. सकाळी पाऊस सुरू असल्याने ऑफिसला निघालेल्यांची आणि शाळकरी मुलांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभरात पावसाचा जोरदार वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलीये.

राज्यासाठी पुढील पाच दिवस धोक्याचे 

सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांच्या पुराचे स्वरूप प्राप्त झालंय. मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा सांगली, छत्रपती संभाजीनगर,नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव, गडचिरोली या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडूनही आज काही भागात येलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय.

कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात पावसाचा अलर्ट 

कोकणात आज जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी राजा चिंतेत होता. पिकांना पावसाची गरज होती. आता पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्ट महिना आला असला तरीही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याचे चित्र बघायला मिळतंय. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला होता.

सावधान पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज 

विशेष म्हणजे सुरूवातीच्या काळात दमदार पाऊसही झाला. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूचा येलो अलर्ट जारी केलाय.  मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील पाऊस दिवस राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. पुढील पाच दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत.

घाट विभागात पावसाचा जोर वाढणार 

बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात शहरासह घाट विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मुळशी धरणातून पुण्यासाठी पाणी पुरवठा, जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय. मुळशी धरणातून वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पुण्याला वळवण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी घेतला. टाटा कंपनी आणि राज्य सरकार यांच्यातील कराराचे उल्लंघन न करता हे पाणी पुण्याला देण्यात येणार आहे. सोलापुरात मागील चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस. रात्रभर पाऊस झाल्यानंतर पहाटे पावसाने घेतली उसंत. सलग सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, तलाव, ओढे ओसंडून वाहू लागले.

उत्तर सोलापुरातील हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे शहरातील ओढा देखील ओव्हरफ्लो झालाय. सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरात पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर, मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगावसह सर्वच भागात अधूनमधून पाऊस सुरू झाला आहे.

मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. तर काही भागांत अजूनही उन्हाचा चटका कायम आहे. दरम्यान, बुधवारपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि इतर भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानुसार पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.