AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दुहेरी संकट! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल 45..

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. उष्णतेत मोठी वाढ झाली. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच उष्णता वाढण्याचेही संकेत आहेत.

राज्यात दुहेरी संकट! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल 45..
yellow alert
| Updated on: Apr 20, 2026 | 7:07 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल होत आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी हवामान विभागाने केला. राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. वर्धा येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 40 च्या पार जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान आहे. नागपूर आणि अमरावती येथे 44 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 17.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वर्धा येथे आजही येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला. 45 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जाण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याचा अंदाज आहे.

राज्यात सूर्य आग ओकत असतानाच उष्णतेपासून दिलासा मिळत असून अवकाळी पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. इंदापूरमध्ये रात्री जोरदार पाऊस झाला. उष्णता वाढत असल्याने आरोग्य धोक्यात आहे. प्रशासनाकडून अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. एकीकडे अकोल्यात तापमानाचा पारा 45 अंशच्या वर पोहोचला आहे.

अशातच दुसरीकडे सायंकाळी अकोल्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून उन्हाचा तीव्र तडाखा वाढला असून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तापमानाचा पारा तब्बल 43.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत असून अनेकांनी दुपारच्या वेळेत घरातच थांबणे पसंत केले आहे.

इगतपुरी शहरासह परिसरात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाळ्याच्या झळा तापदायक ठरत आहे. एप्रिल महिन्यात आता उन्हाच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. त्यातच पहाटेच्या व रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट न झाल्याने उष्णता अनुभवायला मिळत आहे. आज इगतपुरी शहराच कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले असून अजून काही दिवस तापमानात वाढ होत राहण्याची व उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही विभागाने सांगितले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...