AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : तुम्ही फेटा खाली…. ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराजासांठी रुपाली ठोंबरे यांची भावनिक पोस्ट, म्हणाल्या , विकृत लोकांमुळे …

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे महाराज व्यथित झाले. कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणाऱ्या महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यावर अवाढव्य खर्च केल्याने टीका झाली. यावर संतप्त होऊन महाराजांनी कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत दिले. मात्र, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाराजांना भावनिक आवाहन केलं आहे.

Indurikar Maharaj : तुम्ही फेटा खाली.... ट्रोलिंगनंतर इंदुरीकर महाराजासांठी रुपाली ठोंबरे यांची भावनिक पोस्ट, म्हणाल्या , विकृत लोकांमुळे ...
रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट व्हायरलImage Credit source: social media
| Updated on: Nov 14, 2025 | 1:14 PM
Share

कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या ते त्यांच्या कीर्तनामुळे नव्हे तर दुसऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा, ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला. संगमनेरमधील वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने हा सोहळा पार पडला. त्यासाठी गाड्यांची वरात, राजेशाही थाट, रथ, झकपक रोषणाई अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्नासाठी कर्ज काढू नका, असा सल्ला कीर्तनातून देणारे इंदुरीकर महाराज यांनी स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्यावर मात्र बक्कळ पैसा खर्च केला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर आले, व्हिडीओही व्हायरल झाले. ते पाहून लोकांनी हळूहळू त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली, मात्र ट्रोलिंग झाल्यामुळे नाराज झालेल्या इंदुरीकर महाराजांनी नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला.

लेकीच्या साखरपुड्यावरून सतत झालेली टीका, वैयक्तिक पातळीवरील ट्रोलिंग यावर भाष्य करताना इंदुरीकर महाराजंनी ट्रोलर्सना फैलावर घेतले. आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करत इथंपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे, असं म्हणत त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्याची देखील मोठी चर्च होत असून त्यामुळे खळबळ माजली आहे.

मात्र आता त्यांच्या या भाष्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेl. रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट लिहीत इंदुरीकर महाराज यांना ‘फेटा खाली ठेवायचा नाही ‘ असा संदेश दिला आहे. विकृत छपरी लोकांकडे लक्ष देऊ नका, अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी लेक म्हणून विनंती आहे, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

काय आहे रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट..

फेसबूकवरील अधिकृत अकाऊंटवरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी संदेश लिहीला आहे. त्यांची पोस्ट जशीच्या तशी…

” इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी. तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झाला साहजिकच होणार पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात या सोशल मीडियाच्या विकृत छपरी जे माणूस नावावर कलंक आहेत यांच्या कडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, किर्तन,भजनातून समाजातील माता,भगिनी,बंधू साठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे.अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे.त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका. तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री,पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे त्यांना सदबुद्धी,चांगले विचार,चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे आमच्या भगिनी बद्दल कोण बोलत असेल तर त्या वेडी,विकृत माणसावर तुम्ही दुर्लक्ष करा. आम्ही पाहतो त्यांच्याकडे सोशल मीडियावर वेड्याचे सौंग घेण्याकडे त्या वेड्याचे सौंग काढण्याची सुद्धा हिंमत आहेत.त्यांची विकृती ठेचून काढू अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही.ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे. फेटा खाली ठेवायचा नाही.”

असं लिहीत त्यांनी भावनिक आवाहन त्यांना या पोस्टमध्ये केलं आहे. या पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्या आता इंदुरीकर महाराजांसाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.