माधुरी प्रकरणावर बोलणे अंगाशी आले! हिंदुस्तानी भाऊने कोल्हापूरकरांना घाबरुन मागितली माफी? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊ बोलताना दिसत आहे की मी कोल्हापूरकरांसाठी बोललेलो नाही. मी केवळ त्यामध्ये राजकारण करणाऱ्या राजकारण्यांविषयी बोललो आहे. नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...

सध्या सगळीकडे कोल्हापूरच्या नांदणी गावातील माधुरी हत्तीणीची चर्चा सुरु आहे. नुकताच तिला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माधुरीच्या समर्थनार्थ गावात मोर्चे आणि आंदोलने झाली. दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने कोल्हापुरातील रहिवाशांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. अनेकांनी हिंदुस्तानी भाऊने माफी मागावी अशी मागणी केली. आता सोशल मीडियावर त्याचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊ स्वत: बोलताना दिसत आहे. जय श्रीराम! खूप लोकांना अजूनही वाटतय की हिंदुस्तानी भाऊ कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोलला. तर असं काहीच नाही आहे. ही मागे माझी आई आहे. मी तिची शप्पथ घेऊन सांगतो, मी महालक्ष्मीची शप्पथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही बोललो. फक्त याच्यामध्ये जे राजकारण करत आहेत त्यांच्यासाठी बोललो आहे. परत एकदा सांगतो पूर्ण कोल्हापूर बद्दल काहीच नाही. तुम्ही आपले आहेत, तुमच्यासाठी सदैव मी आहे. तुमच्यासाठी ते नाहीये, तुमच्या मनाला लावू घेऊ नका. फक्त काही राजकारण करतात त्यांच्यासाठी आहे आता पण सांगतो.
वाचा: देव असा मृत्यू दुश्मनालाही देऊ नये! या टॉप अभिनेत्रींचा तडफडून अंत, तिसरीची आत्मा तर…
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत, ‘परत कोल्हापूर करांच्या नादाला लागायच्या आधी पायताण आठवणीत ठेव ते पण तेल लावलेलं’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आला का लाइनवर’ असे म्हटले आहे.
प्रशांत भिसेंनी दिली होती धमकी
मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रशांत भिसे यांनी हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार, असा इशारा दिला होता. “कोल्हापूरचं माधुरी हत्तीण प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. त्याचदरम्यान अजून एक विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे रीलस्टार हिंदुस्थानी भाऊने पोस्ट केलेला व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये तो ज्या धनाड्यांनी त्याला पैसे दिले आहेत, त्यांची बाजू घेताना दिसतोय. एवढी मोठी हिंमत आपल्या मराठी माणसांना एक परप्रांतीय येऊन अर्वाच्च भाषेत आई-बहिणींवरून शिव्या देतोय. कोणासाठी तर धनाड्यांसाठी, उद्योगपतींसाठी. मित्रांनो हा हिंदुस्थानी भाऊ म्हणजे विकास पाठक. त्याचं टोपणनाव हिंदुस्थानी भाऊ आहे. हा परप्रांतीय आहे आणि आपल्याला शिव्या देतोय. वाह.. टाळ्या” या भाषेत त्यांनी सुनावले होते.
