AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला याला पुरावा काय? जैन मुनींचा राम कदम यांना सवाल

Ram Kadam : माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला होता असं विधान आमदार राम कदम यांनी केले आहे. यावर आता जैन मुनींनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुमच्या आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला याला पुरावा काय? जैन मुनींचा राम कदम यांना सवाल
Ram Kadam and Jain MuniImage Credit source: Google
| Updated on: Jul 07, 2026 | 6:54 PM
Share

भाजपचे आमदार राम कदम यांनी आज विधानसभेत मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला होता, कबुतरांमुळे होणारे आजार अतिशय घातक आहे. माझ्या आईला ILD (इंटरस्टिशियल लंग डिसीज) हा फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता. या आजारावर ठोस औषध उपलब्ध नाही असं विधान केले होते. यावर आता जैन मुनींनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर राम कदम यांनी उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुमच्या आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला याला पुरावा काय?

निलेश चंद्रमुनी यांनी राम कदम यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, कबुतरांमुळे राम कदम यांच्या आईचा मृत्यू झाला ही गोष्ट खोटी आहे. सत्य असेल तर समाजासमोर आणा, मी राम कदम यांना विचारेल कबुतरामुळे तुमची आई मेली याचा पुरावा मला द्या. राम कदम ही धार्मिक व्यक्ती आहे त्यांचे काम चांगले आहे, समिती बसवून निर्णय घेतला पाहिजे.

CM फडणवीसांनी याकडे लक्ष द्यावे – जैन मुनी

पुढे बोलताना मुनी यांनी म्हटले की, ‘वारंवार नेते लोक येतात, कबुतरांवर बोलतात. कोणी म्हणतो माझी आईचा मृत्यू कबुतरांमुळे झाला. प्रत्येकाची आई महान आहे, सभागृहात त्यांनी आईचा मुद्दा मांडायला नको होता. वारंवार मराठी आणि मारवाडी वाद का निर्माण होत आहे. कबुतरखाने स्थलांतरित करा पण काहीतरी निर्णय करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे. राम कदम हे हिंदुत्वाचे चांगले कार्यकर्ते आहेत.’

आजार जात किंवा धर्म पाहून होत नाही – कदम

जैन मुनींच्या विधानावर बोलताना राम कदम यांनी म्हटले की, ‘जैन मुनी काय बोलले, हे मला माहीत नाही. पण माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला आहे. यासंदर्भातील काय माहिती त्यांना पाहिजे ती त्यांना भेटून देईन. मला कबुतराचा जीव देखील महत्वाचा आहे, त्यामुळे माझ्या आईला देखील एकही कबुतराचा मृत्यू झालेला आवडणार नाही. त्यामुळे कबुतरखाने शहरी वस्तीतून बाहेर काढून त्यांना शहराच्या बाहेर ठेवलं पाहिजे. यात मी कुठेही राजकारण आणणार नाही आणि आजार हा धर्म किंवा जात बघून होत नाही.’

Follow Us
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश