AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये हलवा, आमदार राम कदम यांची मागणी

Ram Kadam : भाजप आमदार राम कदम यांनी मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांनी कबुतरखाने शहराबाहेर नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी केली.

कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये हलवा, आमदार राम कदम यांची मागणी
BJP MLA Ram Kadam on KabutarImage Credit source: Google
| Updated on: Jul 07, 2026 | 6:25 PM
Share

मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये कबुतरखाने आहेत, या ठिकाणी लोक कबुतरांना खाद्य टाकतात. अशातच आता भाजप आमदार राम कदम यांनी मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज या गंभीर आजारामुळे झाल्याचे विधान केले. कबुतरांच्या विष्ठेमुळे हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार पसरतो असं म्हणत कबुतरखाने शहराबाहेरील नॅशनल पार्कमध्ये हलवण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला – राम कदम

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज राम कदम यांनी याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यानंतर बोलताना राम कदम यांनी म्हटले की,’माझ्या आईचा मृत्यू हा कबुतरांमुळे झाला होता, कबुतरांमुळे होणारे आजार अतिशय घातक आहे. माझ्या आईला ILD (इंटरस्टिशियल लंग डिसीज) हा फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता. या आजारावर ठोस औषध उपलब्ध नाही. या आजाराच्या उपचारादरम्यान रुग्णाला सतत ऑक्सिजनवर ठेवावे लागते आणि आजार वाढत गेल्यानंतर प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. माझी आई सलग 15-15 मिनिटे खोकायची. इतका वेळ अखंड खोकल्यामुळे ती बेशुद्ध पडायची. हीच अवस्था अनेक ILD रुग्णांची असते.

कबुतरखाने मुंबईच्या बाहेर नॅशनल पार्कमध्ये हलवा – कदम

पुढे बोलताना कदम यांनी म्हटले की, कबुतरांमुळे होणारे आजार अतिशय घातक आहे. त्यामुळे शहरी वसतीमध्ये असलेले कबुतरखाने हे शहराच्या बाहेर ठेवले पाहिजे अशी मागणी मी केली आहे आणि त्यासंदर्भात एक तज्ञ लोकांची कमिटी तयार करावी असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. मी या विषयात कधीच राजकारण करणार नाही, कबुतर हा एक जीव आहे, त्यामुळे त्यांचा जीव देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे कबुतरखाने हे मुंबईच्या बाहेर नॅशनल पार्कला किंवा फिल्मसिटीला हलवण्यात यावे अशी मागणी केली आहे. आजार हा काय धर्म, जाती बघून होत नाही, त्यामुळे या गोष्टीच्या संदर्भात ही आमची भूमिका आहे.’

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला