AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानात हेडफोन, समोर मोबाईल… व्हिडीओ पाहत समृद्धी हायवेवर बस चालवणाऱ्या ‘त्या’ ड्रायव्हरला अटक

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावले, तर कित्येक जण जखमी झाले. त्याचदरम्यान एक खाजगी बसचालक हेडफोन्स घालून, मोबाईल पहात समृद्धी महामार्गावर बस चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने गदारोळ माजला होता.

कानात हेडफोन, समोर मोबाईल... व्हिडीओ पाहत समृद्धी हायवेवर बस चालवणाऱ्या 'त्या' ड्रायव्हरला अटक
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 18, 2023 | 12:11 PM
Share

जळगाव | 18 ऑक्टोबर 2023 : समृद्धी महामार्गावर (Samruddhi expressway) गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. या महामार्गावर वारंवार अपघात (accidents) झाल्याने अनेकांनी जीव गमावला तर काही जण जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले आहेत. मध्यंतरी झालेल्या भीषण अपघातानंतर सरकारने समृद्धी महामार्गावर अनेक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते, पण त्याबाबत काहीही घडलेलं दिसलं नाही. त्यामुळे समृद्धी महामार्ग आणि त्यावरील वाढते अपघात हा सध्या चिंतेचा विषय आहे.

असे असतानाच या महामार्गावरील एक बसचा व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला असून त्यामुळे गदारोळ माजला आहे. या एका खाजगी बसचा चालक कानात हेडफोन्स लावून, समोर मोबाईल ठेऊन तो पहात (watching mobile while driving bus) बस चालवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. या व्हिडीओमुळे सर्वांनाच धक्का बसला.

अखेर त्या ड्रायव्हरला जळगाव आरटीओ कार्यालयाने शोधून काढले आहे. खाजगी बसच्या त्या चालकावर कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची बसही जप्त करण्यात आली आहे. जळगाव आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह त्यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली.

चालक ताब्यात, बसही जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- नागपूर महामार्गावर धावणारी MH 19 CX 5552 ही संगीतम ट्रॅव्हल्सची खाजगी बस आहे. जळगाव आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ही बस जप्त करत बसचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच मोबाईलवर व्हिडीओ पाहत बस चालवणाऱ्या त्या बसचालकाचाही परवाना निलंबित करण्याची कारवाई सध्या पुणे आरटीओ कार्यालयात सुरू आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. चालका विरुद्ध बुलढाणा येथील आरटीओ कार्यालयाच्या वतीने मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कारवाई

दोन-तीन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा ड्रायव्हर हा कानात हेडफोन घालून स्टिअरिंगवर मोबाइल ठेवून व्हिडीओ पहात-पहात बस चालवत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते. १५ ऑक्टोबर रोजी हा व्हायरल झाल्यानंतर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या बसचा शोध घेतला. तेव्हा ही खासगी बस पुणे-नागपूर महामार्गावर धावणारी जळगावच्या संगीतम ट्रॅव्हलची असल्याचे स्पष्ट झाले. समृद्धी महामार्गावर सतत अपघात सुरू असतानाच, बस चालकाचे हे वर्तन अतिशय बेजबाबदारपणाचे आणि धोकादायक असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त झाली.  त्यानंतर ही खासगी बस जप्त करण्यात आली, तसेच बसचे परमिट निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.