AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट नदीत उडी घेतली अन्…तहसीलदारांच्या धाडसाची चर्चा; वाळू तस्करांना शिकविला धडा!

सध्या जळगावच्या तहसीलदार साहेबांची राज्यभरात चर्चा होत आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी त्यांनी थेट नदीपात्रात उडी घेतली आहे..

थेट नदीत उडी घेतली अन्...तहसीलदारांच्या धाडसाची चर्चा; वाळू तस्करांना शिकविला धडा!
jalgaon tahsildar mahendra suryawanshi
| Updated on: Jul 24, 2025 | 5:34 PM
Share

सरकारी अधिकाऱ्याच्या मनात आलं तर संपूर्ण व्यवस्था बदलू शकते. तशी काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसलाही हलगर्जीपणा न करता समाजात आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. सध्या अशाच एका तहसीलदार साहेबाची राज्यभरात चर्चा होत आहे. वळूतस्करी रोखण्यासाठी या तहसीलदार साहेबांनी एकट्याने नदीपात्रात पोहून वाळूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ धरणगावच्या तहसीलदारांचा आहे. जळगावात वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी कपडे काढून थेट गिरणा नदीपात्रातून घेतली आणि तस्करापर्यंत ते पोहत गेले आहेत.

महेंद्र सूर्यवंशी थेट नदीपात्रात उतरले

तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून बैठक आटोपून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी त्यांना गिरणा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्यासं दिसून आलं. यानंतर महेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचं वाहन उभे करून ते थेट नदीपात्रात उतरले. कपडे काढून नदीतून पोहत जाऊन त्यांनी वाळू चोरट्यांचा पाठलाग केला.

तस्करांनी लगेच काढला पळ

चक्क तहसीलदार आपल्याकडे येत असल्याचे समजताच वाळू चोरी करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. त्यांनी लगेच तिथून पळ काढला. चोरी करणारे ट्रॅक्टर तसेच कामगार तिथून पसार झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तहसीलदार साहेब पोहोत तस्करांपर्यंत जाताना आणि वाळू चोर घाबरून तिथून पळून जाताना या व्हिडीओत दिसत आहे.

तहसीलदारांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक

दरम्यान, अनेक सरकारी अधिकारी वाळू तस्करांना घाबरून असतात. वाळू तस्करीसाठी आडकाठी केल्यामुळे अनेकांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र कशाचाही तमा न बाळगता वाळू चोरट्यांवरील कारवाईसाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी एकटेच कारवाईसाठी नदीपात्रातून पोहत गेल्याचा या कारवाईच्या प्रयत्नाची तसेच त्यांनी दाखवलेल्या धाडसाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनीही या व्हिडिओसह बातमीला दुजोरा दिला आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.