AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षप्रवेशाआधीच भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला; म्हणाले, जिल्ह्यातून त्यांना…

Chalisgoan MLA Mangesh Chavan on Ekanath Khadse and BJP : एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करणार; जळगाव भाजपमध्ये काय घडतंय? पक्षप्रवेशाआधीच भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला... खडसेंना टोला लगावणारा हा नेता कोण आहे? त्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर....

पक्षप्रवेशाआधीच भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला; म्हणाले, जिल्ह्यातून त्यांना...
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 07, 2024 | 3:13 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही वेळाआधी एकनाथ खडसे यांनी स्वत: या बातमीला दुजोरा दिला आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय शरद पवार यांचे आभारही खडसेंनी मानले आहे. त्यावर जळगावमधील स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. वरिष्ठांच्या निर्णयानंतर आणि एकनाथ खडसेंची पूर्णता वापसी झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित राहील. खडसे भाजपमध्ये येत आहे. ते रस्त्यात आहेत. हे बॅग भरली आहे. बॅगेत शर्ट ठेवला. ते निघाले… अशा चर्चांना काही अर्थ नाही, असा खोचक टोला चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर लगावला आहे.

“त्या फक्त चर्चाच राहतील”

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवासी करतील, अशी चर्चा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगताना आपण पाहत आहोत. या चर्चेत रंग पूर्ण भरू द्या. नंतर त्यावर बोलणं उचित राहील. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे आणि ती फक्त चर्चाच राहील अशी शंका आम्हाला आहे. माध्यमांव्यतिरिक्त खडसेंचा भाजपात प्रवेश होणार या विषयाची कुठेही चर्चा नाही, असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

” अमित शाहांना भेटल्याचा फोटो जुना”

एकनाथ खडसे यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो सात वर्षांपूर्वीचा आहे. एखाद्या जुन्या फोटोला वेगळा संदर्भ देणं, याला काही अर्थ नाही. एकनाथ खडसे लोटांगण घालत असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील. जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसेंनी पक्षात पुन्हा यावं अशी मागणी नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले.

संजय राऊतांवर निशाणा

आमदार मंगेश चव्हाण यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊतला कुत्रं विचारत नाही. संजय राऊत यांची लायकी काय आणि ते बोलतात काय? संजय राऊतमध्ये वेडसरपणा सदृश्य लक्षणं दिसत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ती लक्षणही वाढत आहेत.  संजय राऊत यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक कॉट कायमस्वरूपी बुक करावा लागेल. अशी सध्या परिस्थिती आहे, असं चव्हाण म्हणाले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा