AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दहा ते बारा दुचाकींना चिरडलं

जळगाव जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दहा ते बारा दुचाकींना चिरडलं
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2025 | 8:00 PM
Share

जळगाव जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जामनेरमध्ये ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रॅक्टर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात हा अपघात घडला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या टॅक्टरनं उभ्या असलेल्या दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे.  जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणावरून जात असताना अचानक चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरनं या परिसरात पोस्ट ऑफिस तसेच बँकेबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना उडवलं, या घटनेत दहा ते बारा दुचाकींचं नुकसान झालं आहे.

दरम्यान अपघात घडल्यानंतर चालक ट्रॅक्टर जोगेवरच सोडून पसार झाला. चालक दारूच्या नशेत असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दुचाकी मालकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानाची पाहाणी केली. ज्या वाहनांचं नुकसान झालं आहे, त्यांच्या मालकांची नावं लिहून घेण्यात आली आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध सुरू असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती या अपघात प्रकरणात पोलिसांनी दिली आहे.

या अपघातामध्ये दुचाकींचं मोठं नुकसान झालं  आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे, मात्र चालक हा दारूच्या नशेत असावा असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.  अपघातानंतर चालक लगेचच घटनास्थळावरून फरार झाला.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला