AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही तरी मोठं घडतंय..? एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता गिरीश महाजन थेट दिल्लीकडे; 4.30 वाजता…

Eknath Shinde-Girish Mahajan Delhi: छत्रपती संभाजीनगरनंतर जळगावच्या जागेसाठी शिंदे सेना आग्रही आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी इथं फिल्डिंग लावली आहे. तर जळगाव आणि नाशिकच्या जागेचं साटंलोटं टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांनीही कंबर कसल्याचे दिसते.

काही तरी मोठं घडतंय..? एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता गिरीश महाजन थेट दिल्लीकडे; 4.30 वाजता...
एकनाथ शिंदे, गिरीश महाजनImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 24, 2026 | 2:49 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी टीव्ही ९ मराठी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. काही जागांवर अजूनही ओढताण होत आहे. तर पारंपारिक जागांच्या अदलाबदलीची चर्चा असली तरी त्यासाठीही राजकीय समीकरण जुळवताना मोठी कसरत होत असल्याचे दिसते. छत्रपती संभाजीनगरनंतर जळगावच्या जागेवरून असाच पेच निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मुलाला विधान परिषदेचे तिकीट मिळावे यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. जळगावच्या जागेवरून (Eknath Shinde-Girish Mahajan Delhi)  आता थेट दिल्लीत राजकारण तापतंय की काय? अशी चर्चा रंगली आहे.

मंत्री गिरीश महाजनही दिल्लीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल तातडीने दिल्लीला रवाना झाले. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत ते दिल्लीला गेलेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात चर्चेंना उधाण आले. तर त्यांच्या पाठोपाठ आज भाजपचे मंत्री गिरीश महाजन दिल्लीकडे रवाना होणार आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेंच्या पाठोपाठ भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दिल्लीकडे दिल्लीकडे रवाना होत आहेत.

जागांचा तिढा कायम

साडेचार वाजता माझं विमानाचे तिकीट असून दिल्लीला जात आहे. मात्र मी तिकिटासाठी जात नसल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं. उद्यापासून विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याचे प्रक्रिया सुरू होणार असून दिवस कमी असल्याने जागांचा तिढा सोडवण्यासाठी नेते दिल्ली दरबारी जात असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर भाजपकडून मंत्री गिरीश महाजन दिल्लीच्या दरबारी विधान परिषदेच्या जागा संदर्भात बाजू मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सात जागांसाठी शिवसेना आग्रही

प्राथमिक बोलणीत एकूण १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना राज्यात सात जागांवर ठाम असून भाजप केवळ तीन ते चार जागा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेच्या जागांचा वाद आता दिल्लीच्या दरबारी सोडवला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नाशिक आणि जळगावच्या विधान परिषदेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ