AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxman Hake: टमरेल… हरामXXX , जरांगेनंतर लक्ष्मण हाके प्रसाद लाड यांच्यावर घसरले… अश्लाघ्य भाषेचा वापर करत मोठी टीका

Laxman Hake on MLA Prasad Lad: भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यापासून वातावरण तापले आहे. ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यानंतर आमदार लाड यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली.

Laxman Hake: टमरेल... हरामXXX , जरांगेनंतर लक्ष्मण हाके प्रसाद लाड यांच्यावर घसरले... अश्लाघ्य भाषेचा वापर करत मोठी टीका
लक्ष्मण हाके, प्रसाद लाडImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: May 24, 2026 | 2:19 PM
Share

Laxman Hake on MLA Prasad Lad: प्राध्यापक लक्ष्मण हाके पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधातच मोर्चा उघडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत नुकतीच भेट घेतली. त्यानंतर हाके संतापले आहेत. त्यांनी काल परवा मनोज जरांगे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. तर आज त्यांनी सोलापूर इथं आमदार लाड यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका केली. त्यामुळे आता वातावरण तापले आहे.

राज्यात ओबीसींकडे दुर्लक्ष

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रश्न आणि समस्यांचा पाढा वाचला. महाराष्ट्रात सरकार आल्यापासून एकाही ओबीसीचा प्रश्न मार्गी लागतं नाही. जातनिहाय जनगणना होत नाही. आम्ही भयभीत आहोत कारण आम्हाला मोजले जात नाही. आमचा इम्पिरिकल डेटा नाही त्यामुळे आम्हाला मोजले जात नाही. आमच्या वाट्याचा निधी आम्हाला मिळत नाही, एकीकडे कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग होतो मात्र आमच्या हक्काचे काय? जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्याचे काय? मागील 2 वर्षांपासून आंदोलन करतोय. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण लोकनियुक्त सरकारने संपवले आहे. जरांगे सारखा खुळचट माणूस आंदोलनाला बसतो आणि सरकार मागण्या पूर्ण करतो. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी ला पन्नास टक्के निधी अपेक्षित असताना एक टक्क्या पेक्षा कमी निधी ओबीसीला दिला. राठा समाज ओबीसीत समावेश झाला तरी मूळचे ओबीसी कुठे जातील, महाराष्ट्राचे मंत्री ओबीसींच्या हिताचे संरक्षण करणार का? असा एकामागून एक घणाघात लक्ष्मण हाके यांनी घातला.

प्रसाद लाड यांच्यावर टीका

राज्यात विरोधी पक्ष दुर्बीनीने शोधावा लागतोय. मात्र आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार. कोण कुठला प्रसाद लाड, हॉटेलवाला, झाडूपोच्या करणारा आमदार मनोज जरांगे यांच्याकडे जातो. ही टीनपाट माणसे आहेत. लाडला जरांगेकडे पाठवून सरकारने सेल्फ गोल केला आहे, अशी टीका हाके यांनी केली.

टीनपाट, टमरेल जरांगे पाटील म्हणतो ओबीसी आरक्षण देताना सर्वे कधी केला? अरे पन ओबीसीला जनगणगा करायची गरज काय? ओबीसी वर्गातील लोकांनी काय अन्याय सहन केलाय हे तुला काय माहिती? यांना ओबीसी, दीनदलित यांच्याबद्दल याला काय माहिती आहे. प्रसाद लाड नावाचा हरामXXX आमदार आहे. हत्ती अख्खा गेलाय आणि आता शेपूट राहिलाय, असे ते म्हणताय. अगोदर प्रसाद लाड यांनी राजीनामा दिला पाहिजे. न्यायालय म्हणते ओबीसी जन्माला आलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण कशाला हवं. हे आमदार लाड वगैरे पाठीमागे काय उद्योग करतात हे आम्हाला बोलायला लावू नका. जरांगे यांनी ओबीसीत आल्यावर कोणता व्यवसाय स्वीकारला? जरांगेच्या समाजाने आमच्या नंदिवाले प्रमाणे कधी गुबूगुबू हलगी घेऊन गेलाय का? कधी हातात कात्री घेऊन तुझा समाज उतरलाय का? जरांगेंकडे तत्कालीन मुख्यमंत्री, आयएएस, निवृत्त न्यायमूर्ती येऊन गेले तरीही जरांगेंना काही कळले नाही, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी