AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : पोलीस निरीक्षक कीर्तनस्थळी बूट घालून, चाळीसगावमध्ये कार्यक्रम केला बंद, वारकरी संतप्त

चाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माइव व स्पीकर लावून कीर्तन सुरू होते. तेव्हा शहर पोलीस (Police) निरीक्षक के. के. पाटील यांनी यांनी हे कीर्तन बंद पाडले. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले.

Jalgaon : पोलीस निरीक्षक कीर्तनस्थळी बूट घालून, चाळीसगावमध्ये कार्यक्रम केला बंद, वारकरी संतप्त
चाळीसगावमध्ये पोलीस निरीक्षक के. के. पाटील हे बूट घालून कीर्तनस्थळी पोहचले.
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 3:21 PM
Share

जळगावः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावर घेतलेल्या सभेनंतर राज्यभर भोंग्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये ऐन अजानाच्यावेळी गाणे वाजवले म्हणून पहिली तक्रार नोंदवली गेली. तर जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने बंद पाडलेल्या कीर्तनावरून वाद निर्माण झालाय. चाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माइव व स्पीकर लावून कीर्तन सुरू होते. तेव्हा शहर पोलीस (Police) निरीक्षक के. के. पाटील यांनी यांनी हे कीर्तन बंद पाडले. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

चाळीसगावमधल्या सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माइक व स्पीकर लाऊन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू असलेले कीर्तन बंद केले. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विषय असेलल्या नारदांच्या गादीवर ते बूट घालून वर चढले. तसेच वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षकांचा तसा एक फोटोही व्हायरल झाला आहे. रात्री दहा वाजून गेले होते. त्यानंतरही कीर्तन सुरू होते. मात्र, पोलीस निरीक्षकांची वागणुकीची पद्धत अतिशय चुकीची होती, असा आरोप वारकरी संप्रदायातील मंडळींनी केली आहे.

माफी मागण्याची मागणी

पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या वागणुकीमुळे वारकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी. अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी चाळीसागवामधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस निरीक्षकांनी कीर्तनात चक्क बूट घालून प्रवेश केल्याबद्दल निषेध व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदाय अतिशय उदार मानला जातो. इतरांसारखे ते कट्टर नसतात. त्यांच्यामुळे कधी गावात दंगली घडल्याचे ज्ञात नाही. तरीही त्यांच्यासोबत अशी वर्तवणूक केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी आपले वर्तन सुधारावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.