AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंच्या ‘राजकीय घुमजाव’वर जयंत पाटील यांचं भाष्य; म्हणाले, त्यांनी आधी….

Jayant Patil on Eknath Khadse : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि जळगावमधील राजकीय परिस्थिती यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

एकनाथ खडसेंच्या 'राजकीय घुमजाव'वर जयंत पाटील यांचं भाष्य; म्हणाले, त्यांनी आधी....
जयंत पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Sep 22, 2024 | 1:45 PM
Share

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार होते. उघडपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र भाजपकडून ग्रीन सिग्नल न आल्याने खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणं पसंत केलं आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. खडसे यांनी त्यांच्यावरची परिस्थिती मला सांगितली होती. पवार साहेबांना सांगितली होती. त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी काही सूट मागितली होती. त्यावेळी त्यांना सूट देण्याचे ठरवलेलं होतं, असं जयंत पाटील म्हणालेत.

एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर काय म्हणाले?

एकनाथ खडसे यांच्यावर आलेली परिस्थिती ही खूप अडचणीची होती. ती परिस्थिती आता निवळलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यावेळी पक्ष सोडण्याची आवश्यकता वाटली नाही. पण त्यांनी ही परिस्थिती कानावर टाकली होती. खडसे नेत्यांच्या वरचे परिस्थिती मला आणि पवार साहेबांना सांगितले होते. त्यांच्यावर आलेली परिस्थिती प्रचंड अडचणीची होती, असं म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.

जळगावमधील राजकीय परिस्थितीवर जयंत पाटील काय म्हणाले?

जळगाव जिल्हा हा पूर्ण महायुतीच्या विरोधात केलेला मला दिसतो आहे. या ठिकाणची बेरोजगारी, अशी वेगवेगळी कारण याला आहेत त्यामुळे जळगावचे तरुण पेटलेला आहे. मागे असेल बेरोजगारी असेल हे राज्यातले मुख्य प्रश्न आहेत ते जिल्ह्यात सुद्धा आहेत आणि जळगावकरांना ते सहन करावा लागत आहेत. या सर्व प्रश्नांची सुटका करण्यासाठी महाविकास आघाडीचा सोबत राहण्याचा या ठिकाणचा जनतेचा मानस दिसतो आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

निवडणूक आयोगाच्या लोकांना बिचाऱ्यांना अजून माहित नाही की माहितीचे स्थानिक नेते निवडणुकांना अजूनही घाबरलेले आहेत. निवडणुका घ्यायच्या नाही. ते दोन दिवस येऊन गेल्यानंतर त्यांना कळविण्यात येईल की आणखी काही दिवस मार्ग काढा निवडणुका कशा पुढे ढकलता येतील, असं म्हणत जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या दौऱ्यावर भाष्य केलं.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.