कीचड़ में में पत्थर मारने से क्या फायदा; एकनाथ खडसे यांच्याकडे आता शिल्लक राहिलंय काय? शिंदे गटाच्या या नेत्याची बोचरी टीका

Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्याविरोधात शिंदे गटाच्या नेत्याने अत्यंच बोचरी टीका केली आहे. त्यांच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरल्याचा आरोप करण्यात आला. आता खडसे यांच्याकडे शिल्लक राहिलंय काय? असा चिमटा पण यावेळी काढण्यात आला.

कीचड़ में में पत्थर मारने से क्या फायदा; एकनाथ खडसे यांच्याकडे आता शिल्लक राहिलंय काय? शिंदे गटाच्या या नेत्याची बोचरी टीका
एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार प्रहार
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 3:05 PM

भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. गेल्या 30 वर्षांपासून त्यांच्या राजकीय हाडवैर सर्वश्रूत आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. खडसे यांच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरल्याची टीका पाटील यांनी केली. त्यांनी खडसे यांच्याकडे शिल्लक राहिलंय काय? असा चिमटा पण यावेळी काढला. मुक्ताईनगर मतदारसंघात पुन्हा एकदा या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

सध्या घराणेशाहीचं काय काम?

राजाच्या घरात राजा जन्माला यायला नको. घराणेशाही कमी झाली पाहिजे. काही लोक घराणेशाही पुढे आणताय अशी टीका त्यांनी रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला. मात्र सध्या घराणेशाही काहीच कामाची राहिलेली नाही. रूपालीताई चाकणकर जे बोलल्या त्यांच्या वक्तव्याचा मला आधार असल्याचे पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

खडसे यांनी अश्लील भाषणं केली

मी एकनाथ खडसे यांच्याकडे बघतच नाही. आता त्यांचं शिल्लक राहिलं काय? त्यांच्याकडे बघायची स्थिती राहिलेली नाही. खडसे म्हणतायेत राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. मला खडसेंना सांगायचं आहे की खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे. सार्वजनिक भाषणामध्ये अश्लील भाषणे तुम्ही केले. खडसेंचा माझ्यासाठी विषय संपलेला आहे. निवडणुका समोर आहे, येऊ द्या मी त्यांना उत्तर देईल, असे ते म्हणाले.

महिला भगिनी संदर्भात खडसे मागे काय बोलले -अंजली दमानिया संदर्भात महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या घरातही महिला भगिनी आहेत. महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर घाणेरडा -बोलणारा पातळी असेल तर ते खडसे आहेत, असा आरोप करत कीचड़ में में पत्थर मारने से क्या फायदा असा टोला त्यांनी लगावला.

खडसेंवर केली टीका

कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो त्यांना वाटतं की आपला नेता मंत्री व्हायला हवा. पण मी आमदार म्हणूनच इच्छुक आहे. मला मंत्री होण्याचे स्वप्न पडलेले नाहीत आणि माझी इच्छा पण नाही. मला आमदारकीची संधी मिळाली तर मी आमदार होईल ज्यांना मंत्री व्हायचंय एकाला मंत्री केला आणि दुसऱ्याला मंत्री करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे असे खडसेंचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला. काल ज्यांना शिव्या दिल्या त्यांना घरी बोलून त्याची समजूत काढायची अशाप्रकारे मोठ्या नेत्याचा कार्यक्रम आमच्या मतदारसंघात सुरू आहे, असा चिमटा त्यांनी काढला. मंत्री होण्याचा सोडा समोरच्याला ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच करुन दाखवावा असे आवाहन त्यांनी केले.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.