AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणार!; ठाकरे गटाच्या महिला नेत्याने निर्धार बोलून दाखवला

Lalita Patil on Jalgon Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा निर्धार; म्हणाल्या... जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट विजयी होऊ शकतो, असा विश्वास या महिला नेत्याने व्यक्त केला आहे. कोण आहेत. या नेत्या? वाचा सविस्तर...

'या' लोकसभा मतदारसंघात इतिहास घडणार!; ठाकरे गटाच्या महिला नेत्याने निर्धार बोलून दाखवला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 14, 2024 | 3:52 PM
Share

जळगाव | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. आपण जिंकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. काहीच दिवसांआधी ॲड. ललिता पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांसहीत पक्षप्रवेश केला. जळगावमधून लोकसभेसाठी ललिता पाटील या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. आता ललिता पाटील यांनी हा मतदरासंघ जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ॲड.ललिता पाटील यांची जळगाव लोकसभा मतदार संघातून तयारी सुरू केली आहे.

“संधीचं सोनं करणार”

जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ॲड. ललिता पाटील इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेवून परतल्यावर ललिता पाटील यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठकांचा धडाका सुरू केला आहे. पहिल्यांदा मिळलेल्या संधीच शिवसेना ठाकरे गट सोनं करणार आणि जळगाव लोकसभा मतदार संघातून इतिहास घडवणार , असा विश्वास ललिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गाव दौऱ्यांना सुरुवात

जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये ॲड. ललिता पाटील दौरे करत आहेत. त्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात ललिता पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ललिता पाटील यांनी तयारी सुरू केल्याचं बोलले जात आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून इतिहास घडवणार असा विश्वास ललिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जळगावातील लोकसभेची लढत

कालच भाजपने दुसरी मतदार यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत. यात जळगाव लोकसभेतून स्मिता वाघ यांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे. अशात जर महाविकास आघाडीने आणि विशेष करून ठाकरे गटाने जर ललिता पाटील यांना उमेदवारी दिली तर या दोन महिला नेत्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

Follow Us
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट