AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही”; राष्ट्रवादीच्या नेत्याने गिरीश महाजन यांचं महत्व कमी केलं

कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी त्यांना लगावला आहे.

कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने गिरीश महाजन यांचं महत्व कमी केलं
| Updated on: May 13, 2023 | 6:40 PM
Share

जळगाव : कर्नाटकसारख्या राज्यात भाजपला जोरदार धक्का बसल्याने आता महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. कर्नाटक राज्याच्या निवडणुका जाहिर झाल्यापासून काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगला होता. त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर आता जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. या निकाला नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर सडकून टीका करत प्रचारयंत्रणेपासून ते अगदी नेतृत्वापर्यंत त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची खिल्ली उडवली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाकयुद्ध राज्याला माहिती आहे. त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

त्यातच जळगावमधून भाजपवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानी भाजपच्या नेत्यांची त्यांच्या प्रचारावरून खिल्ली उडवली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी त्यांना लगावला आहे.

त्यामुळे कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली आहे.

कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालावरून असं दिसून येतं की, महाराष्ट्रात जर आजही निवडणुका झाल्या तर मात्र भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही आणि विरोधी पक्षाचेच सरकार महाराष्ट्रात येईल हे 100 टक्के खरं आहे असा विश्वासही त्यांनी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, हे खरं आहे की कर्नाटक निवडणुकीसाठी मी गेलो होतो.

आणि त्यामुळेच 10 पैकी 5 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी 50 टक्केच विजय साजरा करावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

माझ्यावर टीका करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांनी आधी तुम्ही मुक्ताईनगर पुरते बघा एक मार्केट कमिटी तुम्ही जिंकली तर तुम्ही पोकलँडवरुन मिरवणूक काढता, एक मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटी जिंकली आणि पोकलँडवर चढून नाचून राहिला असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

या सर्व राजकारणावरून असं वाटत आहे की, एकनाथ खडसे यांचे आता जिल्ह्यात फारसं महत्व राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

एक मार्केट कमिटी घेतली तर त्यांना असं वाटते की पुरा महाराष्ट्रात जिंकला. त्यामुळे एकनाथ खडसे तुम्ही तब्बेतीला मानवेल तेवढचं करा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.