50 खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके…; अमोल कोल्हेंची नवी घोषणा चर्चेत

Amol Kolhe on Mahayuti : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. जळगावमधील सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसंच एक नवी घोषणाही दिली आहे. त्यांचं हे विधान चर्चेत आहे. वाचा सविस्तर..

50 खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके...; अमोल कोल्हेंची नवी घोषणा चर्चेत
अमोल कोल्हे, खासदार- शिरूरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 3:37 PM

एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड केल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ’50 खोके, एकदम ओके’ अशी घोषणा यावेळी महाविकास आघाडीकडून वारंवार दिली जात होती. आता महायुतीतील नेत्याने त्यापुढे जात विधान केलं आहे. राष्ट्रवादी ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज जळगावमधील चोपडा या ठिकाणी आहे. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दमदार भाषण केलं. तेव्हा त्यांनी नवी घोषणा दिली. 50 खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके, असं अमोल कोल्हे म्हणाले. त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे.

अमोल कोल्हेंची अनिल पाटलांवर टीका

ठेकेदार कहता है मे भिकारी हुँ. अफसर कहता है मै पुजारी हूँ. आजकाल सत्ता पक्ष के नेता कहने लगे मै तो व्यापारी हुँ…, जनता कहती मैं बिचारी हुँ… जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या पाच आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटलं होतं की आम्ही काहीतरी शिवसेनेचे वाघ निवडून दिले. ५० खोके एकदम ओके आणि वाघांचे झाले बोके. राष्ट्रवादीचा एक आमदार सुद्धा जळगाव जिल्हा शरद पवार यांच्या ताकतीवर निवडून आला मात्र मंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी गद्दारी केली…, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या सहा आमदारांनी गद्दारीचा वार हा जनतेच्या काळजावर केला आहे. याचे उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला द्यावा लागेल. सीमेचा रक्षण करणारा जवानाच्या एका भावी पत्नीचे पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषण करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचा सत्ता असलेल्या राज्यात हे झालं. गद्दार आमदार म्हणत होते की आम्ही हिंदूंसाठी केली आणि अत्याचार होतो का तेव्हा कुठे गेले होते यांचे हिंदुत्व…. तेव्हा लाज वाटली नाही का तुम्हाला… छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणारा या महाराष्ट्रात दोन चिमुकलींवर अत्याचारवर होतो. तेव्हा तुम्ही गप्प कसे? हिंदुत्व सांगणारे तुम्ही, मग तुम्हाला का नाही बोलता आलं? गृहविभागाचा निषेध करतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.

लाडकी बहिण योजनेवरून सरकारला घेरलं

जर तुम्हाला गुजरातचे चाकरी करायचे असेल तर मत मागायला इकडे कशाला येता गुजरातमध्ये जा… बहीण जर लाडकी आहे तर ती सुरक्षित सुद्धा असली पाहिजे. आज सुरक्षिततेचा हक्क तिला मिळाला पाहिजे. सध्याचे सरकार कसं चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंनी सरकारवर टीका केलीय.

Non Stop LIVE Update
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.
खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
खाल्ल्या ताटात घाण करणारे उदय सामंत, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'
अजितदादांनी खोतांना झापलं, 'निषेधच नाही तर मी त्यांना फोन केला अन्...'.
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड
खोतांचं जतच्या सभेत पवारांच्या आजारावरुन वादग्रस्त वक्तव्य, टीकेची झोड.
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध
'लाडक्या बहिणीं'ना आता 1500 नाही 2100 रूपये मिळणार, राज ठाकरेंचा विरोध.
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'
राज ठाकरेंचा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांना सवाल, 'आरक्षण कस मिळेल?'.
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.