AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नागरिकांचा आता केंद्र-राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत चालला”; राष्ट्रवादीच्या नेत्याने जनसामान्यांची बाजू सांगितली…

या आमदारांना या जनतेचं काही घेणं देणं पडलेलं नाही असा घणाघाही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपाला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही विरोधकांनी व्यक्त केला.

नागरिकांचा आता केंद्र-राज्य सरकारवरचा विश्वास कमी होत चालला; राष्ट्रवादीच्या नेत्याने जनसामान्यांची बाजू सांगितली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 18, 2023 | 10:12 PM
Share

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासह 40 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर अजित पवार यांनी आपण कुठेही जाणार नसून आपण शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबणार असल्याचे सांगत यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्याविषयी भाष्य केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.त्यामुळे ते एक जबाबदार पदाधिकारीही आहेत.

त्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या पक्षांमध्ये लोक येतील अशी आशा व्यक्त करणे हे काही गैर नाही असा खोचक टोला त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी टीका करताना म्हणाले की, राज्यासह देशात प्रचंड समस्या वाढल्या आहेत. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण समस्यांनी त्रस्त आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तर दुसरी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे.

नागरिकांच्या या कोणत्याही समस्यांकडे ना केंद्राचे लक्ष आहे ना राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यावरील आता नागरिकांचा विश्वास कमी होत चालला असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

राज्यात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे, त्याचा फटका जनसामान्यांना बसला आहे. त्याकडेही सरकारचे दुर्लक्ष केले जात आहे. पेट्रोल, गॅसच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत.

त्यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालं आहे तरीही सरकार याकडे लक्ष देत नसल्याने आता लोकांकडून सरकारवर नाराजी व्यक्त केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहे.

नैसर्गिक संकट आणि बाजारभावामुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. त्याचा फटका येथील प्रत्येक शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रातच झाल्या असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांचीही चिंता नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनीही ठाकरे गटाच्या टीकेच्या सूरात सूर मिसळून त्यांनीही 50 खोके एकदम ओके अशा मस्तीमध्ये हे आमदार सध्या वावरत आहेत. त्यामुळे या आमदारांना या जनतेचं काही घेणं देणं पडलेलं नाही असा घणाघाही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका झाल्या तर भाजपाला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर