AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE :PM मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा – राहुल गांधी

| Edited By: | Updated on: Jul 29, 2026 | 7:25 PM
Share

Maharashtra News LIVE : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आज भारतीय हवामान विभागाने राज्यभर पावसाच मोठा इशारा दिला. पुढील काही तास अत्यंत धोक्याची असणार आहेत.

Maharashtra News LIVE :PM मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा - राहुल गांधी
Breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Jul 2026 07:54 PM (IST)

    रायगड : पाली-खोपोली मार्ग खड्डेमय; वाहनचालकांचा जीव धोक्यात

    पाली-खोपोली मार्गावरील पालीफाटा ते मिरकूटवाडी, खाणाव ते डोणवतपर्यंतचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने संपूर्ण मार्ग धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी चालकांनाही वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अनेकदा वाहनांचे संतुलन बिघडण्याच्या घटना घडत आहेत.

  • 29 Jul 2026 07:40 PM (IST)

    SIR च्या कामासाठी KDMC कर्मचारी व्यस्त; नागरिकांची कामे रखडली

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील नागरिक सुविधा केंद्रासह विविध प्रभाग कार्यालयांमधील अनेक कर्मचारी SIR च्या कामात गुंतल्याने नागरिक सुविधा सेवा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. मालमत्ता कर, दाखले, परवाने आणि इतर नागरी कामांसाठी आलेल्या नागरिकांना लांबच लांब रांगा लावून अनेक तास अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

  • 29 Jul 2026 07:25 PM (IST)

    PM मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्यावा – राहुल गांधी

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत मोठे दावे करत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गांधी म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ला झाला. एका विद्यार्थ्याला डोळा गमवावा लागला. ज्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गनच्या मदतीने हल्ले करण्यात आले. त्यांच्या शरीरात छर्रे आहेत. अमित शाहा हे फोनवरून आदेश देत होते. मी स्वत: पाहिलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहा यांचा राजीनामा घ्यावा. शाहा यांना पदावरून हटवावं.’

  • 29 Jul 2026 07:12 PM (IST)

    पुणे–दिघी–ताम्हिणी महामार्ग गेल्या 25 दिवसांपासून बंद

    रायगड–पुण्याला जोडणारा महत्त्वाचा पुणे–दिघी–ताम्हिणी महामार्ग गेल्या 25 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता बंद, काम अपूर्ण… मग नागरिकांनी आणखी किती दिवस त्रास सहन करायचा? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

  • 29 Jul 2026 05:54 PM (IST)

    गृहमंत्र्यांवरील राहुल गांधी यांचे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळले

    गृहमंत्री यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे. भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींनी केवळ खळबळ माजवण्यासाठी सभागृहात गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतले. विद्यार्थी मूर्ख किंवा अंधभक्त नाहीत. राहुल यांनी त्यांचा अपमान केला आहे. संबित पात्रा पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्याप्रमाणे गृहमंत्री गुप्तपणे परदेशात प्रवास करत नाहीत; ते आपले काम जाहीरपणे करतात.

  • 29 Jul 2026 05:48 PM (IST)

    परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर झाल्याबद्दल देशभरातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन: अमित शाह

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026 मंजूर झाल्याबद्दल देशभरातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हे विधेयक सार्वजनिक परीक्षांच्या पावित्र्याशी तडजोड करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करते.

  • 29 Jul 2026 05:45 PM (IST)

    शेतकरी ट्रॅक्टर घेऊन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानाजवळ दाखल

    शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भोपाळमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेतकरी चौहान यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी दाखल झाले आहेत. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आहेत.

  • 29 Jul 2026 05:28 PM (IST)

    एफडीएने सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये अन्न पाकिटांवर बंदी घातली

    एफडीएने एक मोठा निर्णय घेतला आहे. एफडीएने सरकारी आणि खाजगी दोन्ही शाळांमध्ये उच्च-चरबीयुक्त आणि आरोग्यासाठी हानिकारक खाद्यपदार्थांच्या पॅकेजच्या विक्रीवर बंदी घातली आहे. आता, दिल्या जाणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थासाठी एफएसएसएआय परवाना आवश्यक असेल.

  • 29 Jul 2026 05:18 PM (IST)

    राहुल गांधी आज सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सायंकाळी 6 वाजता दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले, “आज संसदेतील माझ्या भाषणादरम्यान, मी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतले. भाजपने मला बोलू दिले नाही. आज संध्याकाळी 6 वाजता मी पत्रकार परिषद घेईन आणि सभागृहात मला जे बोलू दिले नाही ते सर्व काही सांगेन. मायक्रोफोन बंद केले जाऊ शकतात, पण विद्यार्थ्यांचे आवाज नाही.”

  • 29 Jul 2026 05:06 PM (IST)

    शरद पवारांची भेट घेण्याचं कारण काय? दिलीप वळसे पाटील म्हणाले…

    शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण दिलीप वळसे पाटील ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  ‘कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. रयत शिक्षण संस्थेसंदर्भातील पूर्व नियोजित बैठक होती. चंद्रकांत दळवी, भगीरथ शिंदे आदी उपस्थित होतो. गुरुपौर्णिमा आहे. त्यांना फुलं देऊन त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. रयत शिक्षण संस्थेबाबत चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. होण्याची शक्यता नाही. राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचा अधिकार नाही.’, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

  • 29 Jul 2026 04:58 PM (IST)

    गोंदियात दुपारनंतर दमदार पावसाची हजेरी

    गोंदिया जिल्ह्यात आज देण्यात आलेल्या पावसाच्या ‘रेड अलर्ट’नंतर दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कुठेही पूर परिस्थिती निर्माण झालेली नाही. तर गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या दमदार पावसाने मोठा दिलासा मिळाला असून शेतीकामांना आता चांगलाच वेग येणार आहे. सोबतच, या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यातही तसेच नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

  • 29 Jul 2026 04:39 PM (IST)

    भोपाळमध्ये किसान मोर्चाच्या आंदोलनात मोठा गोंधळ

    भोपाळमध्ये किसान मोर्चाच्या आंदोलनात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. येथे पोलीस आणि आंदोलकांत धक्काबुक्की झाली आहे. सध्या येथे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातोय

  • 29 Jul 2026 04:21 PM (IST)

    SIR च्या कामासाठी KDMC कर्मचारी व्यस्त; नागरिक सुविधा केंद्रात रिकाम्या खुर्च्या, कामांसाठी आलेले नागरिक तासन्‌तास ताटकळले!

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील नागरिक सुविधा केंद्रासह विविध प्रभाग कार्यालयांमधील अनेक कर्मचारी SIR च्या कामात गुंतल्याने नागरिक सुविधा सेवा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. मालमत्ता कर, दाखले, परवाने आणि इतर नागरी कामांसाठी आलेल्या नागरिकांना लांबच लांब रांगा लावून तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

  • 29 Jul 2026 04:08 PM (IST)

    जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे

    जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली मात्र पुन्हा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे झाली आहे. खड्ड्यांमधून वाहन चालवताना नागरिकांना मोठे कसरत करावी लागत असून खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.

  • 29 Jul 2026 04:00 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अभिजीत दिपके यांचं आगमन

    छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अभिजीत दिपके यांचं आगमन

    अभिजीत दीपके यांच्या स्वागतासाठी आई-वडिलांसह समर्थकांची गर्दी

    जंतर -मंतरवरील आंदोलनानंतर पहिल्यांदाच अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

    अभिजीत दिपके यांचं विमानतळावर भव्य स्वागत

  • 29 Jul 2026 03:54 PM (IST)

    गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी

    गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी

    श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात उद्योगपती राणा सुर्यवंशी आणि सोलापूरचे पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी यांना मुख्य आरती आणि महापूजेच मान

    स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल

  • 29 Jul 2026 03:30 PM (IST)

       लासलगावच्या नाफेड गोदामात १,५०० मेट्रिक टन कांद्याची आधुनिक साठवण चाळ 

    लासलगावच्या नाफेड गोदामात १,५०० मेट्रिक टन कांद्याची आधुनिक साठवण चाळ

    सेन्सरच्या मदतीने कांद्यातील गॅसची तत्काळ माहिती मिळणार

    स्वयंचलित ब्लोअरमुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण होणार कमी

    पावसाळ्यात कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

    अशी पद्धतीने आधुनिक कांदा चाळी उभारल्यास शेतकऱ्यांनाही होणार फायदा

  • 29 Jul 2026 03:14 PM (IST)

    मिरा रोड येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’चं उद्घाटन

    गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मिरा रोड येथील डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात ‘महाराजस्व समाधान शिबिर’ व ‘कलेक्टर लँड नाव नोंदणी अभियाना’चा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ झाला. याद्वारे  १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाशांना १५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेचे कायमस्वरूपी मालकी हक्क देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ​

  • 29 Jul 2026 02:50 PM (IST)

    नवीन गाड्यांची मागणी विरोधी पक्षांनी केली- रितू तावडे

    महापालिकेत सहा महिन्यांमध्येच नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी, सध्याच्या गाडीमुळे पाठीचा त्रास होतो, तक्रार होती. गाड्यांची मागणी किशोरी पडणेकरांनी केली. पेडणेकरांना बंगला चालतो पण गाडी चालत नाही याचं आश्चर्य वाटतं असे म्हटले.

  • 29 Jul 2026 02:40 PM (IST)

    कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढली

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे वारणा धरण 84 टक्के भरले आहे. या वारणा धरणातून 7000 वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात होत आहे. तर दुसरीकडे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणातून एक हजार पेक्षा वेगाने पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

  • 29 Jul 2026 02:30 PM (IST)

    पुणे महापालिकेसमोर युवक काँग्रेसचे आंदोलन

    दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी युवक आंदोलन करत असल्याचे समोर आले आहे. आता पुणे महानगरपालिकेसमोर युवक काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे.

  • 29 Jul 2026 02:20 PM (IST)

    जळगावच्या चाळीसगाव शहरात पावसाला सुरुवात

    जळगावच्या चाळीसगाव शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. १ तासांपासून रिमझिम पाऊस सुरु. सलग सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासाठी यापूर्वीच पावसाचा इशारा दिला होता.

  • 29 Jul 2026 02:10 PM (IST)

    मराठ्यांनी आजपासून आंदोलनाच्या तयारीसाठी तुटून पडायचं- मनोज जरांगे पाटील

    मराठ्यांनी आजपासून आंदोलनाच्या तयारीसाठी तुटून पडायचं. मला फक्त अंतरवालीत येऊन भेटून गेलं तरी बस. मराठा आमदार, माजी आमदार, खासदार,यांच्यासह सर्वांनी या अन्यथा मराठे तुम्हाला सोडणार नाही. व्यवसायिक मराठे, उद्योजक मराठे, डॉक्टर वकील यांनी अंतरवाली या असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 29 Jul 2026 01:56 PM (IST)

    लोकसभेच कामकाज आता 2:30 वाजेपर्यंत स्थगित

    सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर अनेक आरोप केले. यानतंर सभागृहात बराच गदारोळ निर्माण झाला आणि त्यामुळे आता लोकसभेच कामकाज आता 2:30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

  • 29 Jul 2026 01:53 PM (IST)

    ‘नोटीस शिवाय कोणीच कोणावर आरोप करु शकत नाही.’ – लोकसभा अध्यक्ष

    “सभागृह नियमांच्या आधार चालणार आहे. राहुल गांधीनीं सभागृहात नियमानुसार बोलावं. नोटीस शिवाय कोणीच कोणावर आरोप करु शकत नाही. ‘ असे लोकसभा अध्यक्ष यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सांगितले आहे.

  • 29 Jul 2026 01:46 PM (IST)

    राहुल गांधाीनी माफी मागावी- किरेन रिजीजू

    गृहमंत्र्याबद्दल राहुल गांधीने जे विधान केले आता त्या संदर्भात त्यांनी माफी मागावी किंवा आरोप सिद्ध करावे अशी मागणी किरेन रिजीजू यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत.

  • 29 Jul 2026 01:42 PM (IST)

    गृहमंत्री घाबरले आहेत म्हणून ते लोकसभेत येत नाहीत- राहुल गांधी

    “गृहमंत्री लोकसभेत का येत नाही? गृहमंत्री घाबरले आहेत म्हणून ते लोकसभेत येत नाहीत.” असे विधान राहुल गांधी यांनी करतात सत्ताधाऱ्यांनी पुन्हा गदारोळ करायला सुरुवात केली आहे.

  • 29 Jul 2026 01:39 PM (IST)

    RSS विद्यार्थ्यांना अंधभक्त बनवण्याचं काम करत आहे – राहुल गांधी

    “RSS विद्यार्थ्यांना अंधभक्त बनवण्याचं काम करत आहे, प्रत्येक विद्यापीठात RSS चे कुलगुरु आहेत. धमेंद्र प्रधान फक्त शिक्षण खात्याचा मुखवटा होते.” अशी टीका राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे.

  • 29 Jul 2026 01:35 PM (IST)

    राहुल गांधी यांची RSS वर टीका

    “शिक्षण व्यवस्थेने RSS वर ताबा मिळवला आहे. RSS ची लोक मंत्र्यालयाच्या कार्यालयात असतात. शिक्षण मंत्रालय RSS चालवतंय. ” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

  • 29 Jul 2026 01:21 PM (IST)

    ‘अंधभक्त हे मूर्खांनाच देव मानतात’- राहुल गांधी

    अंधभक्त हे मूर्खांनाच देव मानतात असं राहुल गांधी यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ सुरु झाला.  तर यावर राहुल गांधीनी लोकसभेत असंसदीय भाषा वापरली असा आरोप किरेन रिजीजू यांनी केला आहे.

  • 29 Jul 2026 01:17 PM (IST)

    राहुल गांधीच्या भाषणादरम्यान लोकसभेत गदारोळ

    “सत्याचं बाजूने राहणं विद्यार्थ्यांचं लक्ष असतं, विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसा नाही तर तर ती अभिव्यक्ती आहे. ” हे बोलत असताना लोकसभेत राहुल गांधीच्या भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांचा गदारोळ पाहायला मिळाला.

  • 29 Jul 2026 01:12 PM (IST)

    लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु

    लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांच्या आक्रोश योग्य होता. तर विद्यार्थ्यांचे आंदोलन शांतेत पूर्ण होतं. आंदोलक विद्यार्थ्यांवर देशाला गर्व आहे. तरुणांच्या भावना संपूर्ण देशाने समजून घेतल्या. भाजपाच्या नेत्यांचे मुले देखील या आंदोलनाला सहमत असतील.”

  • 29 Jul 2026 01:06 PM (IST)

    मनोज जरांगेचा सरकारवर हल्लाबोल

    मनोज जरांगे म्हणाले की, “जाणून बुजून सरकार वाटोळं करायचं आहे का? त्यामुळं आता समोरासमोर सोक्षमोक्ष करायचा आहे. ज्या मुलांचे अण्णासाहेब महामंडळाचे परतावे राहिले त्यांना सांगतो अंतरवालीत या. ज्या मुलांना ecbc मधून लाभ मिळाला नाही त्याचा प्रत्यक्ष अर्ज घेऊन 28 ऑगस्ट ला घेऊन या. ज्या मुलांच्या ews, ecbc मधून निवडी झाल्या त्या सर्व मुलांनी अंतरवालीत या(कोणताही विभाग असू द्या). तेव्हा मी सरकारला दाखवतो की मराठ्यांवर अन्याय केला म्हणून. सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहे पण सुरु कराव्यात असं वाटतं. ज्यांना माहिती की सारथी योजना बंद आहेत त्यांनी अंतरवालीत समक्ष या. सरकारला दिसू की ह्या मुलांचं आपल्या समोर हाल झालंय.”

  • 29 Jul 2026 12:50 PM (IST)

    सारथीच्या योजना बंद, मुलांसमोर आता सोक्षमोक्ष होणार- मनोज जरांगे

    “सारथीच्या योजना बंद करत आणल्या आहेत. ते फक्त कागदावर सुरु आहेत. परंतु मुलं सांगत आहेत की ती योजना बंद आहे. आता मुलांसमोर सोक्षमोक्ष होणार आहे. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली होती, यांना स्थापन करायला काय अडचण आहे? मला कोणी म्हटलं तर त्यांचं नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे. त्या 9 लोकांची नावं सांगणार आहे. सरकार कुणाचंही असू द्या, आपल्या मुलांना अधिकारी करा. 29 ऑगस्ट रोजी गावागावातले मराठे वाघासारखे तुडून पडणार आहेत,” असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 29 Jul 2026 12:39 PM (IST)

    आमचा संयम सुटेल इतकं आम्हाला मुर्खात नका काढू- मनोज जरांगे

    “मी मागे काही दिवसांपूर्वी बाजावार बसून उपोषण केलं, तेव्हा यांनी एक जीआर काढला. विखे पाटील मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत की नाही, तेसुद्धा माहीत नाही. एकही योजना अजून लागू नाही. नेमकं सरकार मराठ्यांना मूर्खात काढतंय की कॉलेजवाले मुर्खात काढायला लागले आहेत तेच कळत नाही. फक्त उपसमितीच्या बैठका सुरु आहेत. ओबीसी सवलती लागू केल्या तर त्या संबंधित मंत्रालयाला सांगा. आमचा संयम सुटेल इतकं आम्हाला मुर्खात नका काढू. आता जे व्हायचं ते होऊ द्या,” असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय.

  • 29 Jul 2026 12:33 PM (IST)

    यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी जातोय- मनोज जरांगे

    “यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी जातोय. 28 ऑगस्टच्या आत आम्हाला निर्णय पाहिजे, अन्यथा 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आम्हालाच मारून आमच्यावर केसेस? आता तुकडा पडल्याशिवाय थांबायचा नाही. 29 ऑगस्टला आपल्याला एकही मागणी मागे ठेवायची नाही. सगळ्या केसेस मागे घेतल्याशिवाय हटायचं नाही,” असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.

  • 29 Jul 2026 12:24 PM (IST)

    58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही- मनोज जरांगे

    “समाजातील लेकरांचे हाल होत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रक्त जळतोय. म्हणून समाजाच्या लेकरांसाठी शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. एकानेही घरी थांबायचं नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही. हैद्राबाद गॅझेटीयर दिलं तर मग् प्रमाणपत्र का दिलं नाही? मराठ्यांना टार्गेट कशामुळे करता? आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला, आता तुकडा पडल्याशिवाय राहणार. हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता थांबणार नाही,” असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय.

  • 29 Jul 2026 12:20 PM (IST)

    मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू- मनोज जरांगे

    29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन हे निर्णायक करायचं आहे. मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे घ्यायचे नाहीत. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, अर्ज करा. एकतर मी जाईन किंवा ते जातील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

  • 29 Jul 2026 12:16 PM (IST)

    आपल्याला हे शेवटचं आंदोलन करायचं आहे, निर्णायक करायचं आहे- मनोज जरांगे

    आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची मराठा बांधवांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे. “आपल्याला हे शेवटचं आंदोलन करायचं आहे आणि निर्णायक करायचं आहे”, असं जरांगे म्हणाले.

  • 29 Jul 2026 12:13 PM (IST)

    विरोधकांनी विधेयकावर चर्चा करावी- लोकसभा अध्यक्ष

    विरोधकांनी विधेयकावर चर्चा करावी. विधेयकाशी संबंधित मंत्री सभागृहात उपस्थित आहेत, असं लोकसभा अध्यक्ष त्यांनी स्पष्ट केलंय. सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नसल्याने विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली होती.

  • 29 Jul 2026 12:07 PM (IST)

    लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह सभागृहात या, अशा घोषणाबाजी विरोधकांनी लोकसभेत केल्या आहेत. पंतप्रधान मोदी सभागृहात न आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

  • 29 Jul 2026 12:05 PM (IST)

    राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित

    लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं असून, राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधकांनी गदारोळ निर्माण केला. थोड्याच वेळात राहुल गांधी लोकसभेत बोलणार आहेत.

  • 29 Jul 2026 11:53 AM (IST)

    भुसावळमध्ये RPF जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन

    भुसावळमध्ये RPF जळगाव पोलीस दलातर्फे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं.  100 हून अधिक संशयित आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली.  कारवाईदरम्यान पोलिसांनी  30 जणांना ताब्यात घेतले आहे.  रेल्वेचे भंगार , दीपनगर प्रकल्पातील कोळसा चोरी लूटमार, खून अनेक गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यात आली. पहाटेपासून राबवण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान काही आरोपींकडून शस्त्र व चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

  • 29 Jul 2026 11:39 AM (IST)

    पालिका आयुक्त तुमचे लाड पुरवायला बसेल आहेत का ? किशोरी पेडणेकर यांची टीका

    मुंबई महापालिकेची लूटमार सुरू आहे असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या नव्या गाड्या खरेदीच्या प्रस्तावावर टीकास्त्र सोडलं.  पालिका आयुक्त तुमचे लाड पुरवायला बसेल आहेत का ? असा सवाल त्यांनी विचारला. तर सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे, अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली.

  • 29 Jul 2026 11:21 AM (IST)

    दिल्लीत बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत सकारात्मक चर्चा

    दिल्लीत बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली .  या बैठकीत शिवडीतील बीपीटी मालकीच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 29 Jul 2026 11:12 AM (IST)

    कल्याण – गोदरेज प्रकल्पावर भीषण अपघात, 2 मजूनर गंभीर जखमी

    कल्याणजवळील आंबिवली-वडवली येथील गोदरेज कन्स्ट्रक्शन प्रकल्पात काम करताना दोन मजूर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. सुरक्षा साधने न पुरवल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   अपघातात मजरूल रेहमान यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून मुस्ताक अली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

  • 29 Jul 2026 10:57 AM (IST)

    दिल्लीत बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत सकारात्मक चर्चा

    दिल्लीत बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत सकारात्मक चर्चा  करण्यात आली. राजेयसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली. शिवडीतील बीपीटी मालकीच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर.

  • 29 Jul 2026 10:47 AM (IST)

    नाशिक : शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे शिवसेना आक्रमक

    नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे शिवसेना आक्रमक झाले आहेत शिवसेना नगरसेवक कैलास मुदलियार यांनी बॅनर लावत निषेध  व्यक्त केला. वारंवार विनंती करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याचा बॅनर वर उल्लेख करण्यात आला.  नाशिककर खड्ड्यात तरी अधिकारी सुस्त असल्याचा आरोप होत आहे.

  • 29 Jul 2026 10:37 AM (IST)

    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ

    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे 60 हजार क्यूसेक इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला. या विसर्गाचा परिणाम पंढरपूरातील चंद्रभागा नदीवर दिसून येत असून नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीपात्रातील पुंडलिक मंदिराला पाण्याने वेढा दिला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर चंद्रभागेच्या पात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी एन डी आर एफ च्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

  • 29 Jul 2026 10:25 AM (IST)

    सांगली बाजार समितीचे त्रिभाजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द… भाजपाला मोठा धक्का

    सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार विभागाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करत कवठेमहांकाळ आणि जत कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचे आदेश दिले होते, त्यांनी विरोधात बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाकडुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली होती.ज्यावर कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारच्या त्रिभजनाच्या आदेश रद्द केला आहे, तसेच राज्य सरकारला त्रिभाजनाबाबत फेर सुनावणी घेऊन,पुढील निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान संचालकांना तुर्त दिलासा मिळाला आहे,तर न्यायालयाच्या निर्णयामुळे आमदार सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

  • 29 Jul 2026 10:24 AM (IST)

    राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध – दत्तात्रय भरणे

    राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. 2 लाखाच्या आत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. रकमेबाबत शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज करु नये… कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्याचं काम सुरु आहे… असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे.

  • 29 Jul 2026 10:19 AM (IST)

    85 कंपन्यांवर कारवाई, बियाणं बदलण्याचे आदेश – दत्तात्रय भरणे

    85 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून बियाणं बदलण्याचे आदेश दिले आहेत. मका आणि सूर्यफुलाची पेरणी सर्वाधिक झाली आहे. राज्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.. असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे.

  • 29 Jul 2026 10:14 AM (IST)

    जळगावमधील इच्छादेवी चौकात कार- दुचाकीचा भीषण अपघात , दुचाकीस्वाराचा मृत्यू , चार जण जखमी

    जळगावमधील इच्छादेवी चौकात कार- दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. लीलाधर मंगल पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या 36 वर्षीय दुचाकीस्वाराचे नाव असून कंपनीत कामावर जाताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कार मधील चार जण देखील गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार दुभाजकाला धडकून दोन वेळा रस्त्यावर उलटली. या अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई सुरू आहे..

  • 29 Jul 2026 09:43 AM (IST)

    महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय – संजय राऊत

    महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय. मुख्यमंत्री आंदोलक, विद्यार्थ्यांना शिव्या घालत आहेत. राज्यात शिक्षणात अराजकता माजलीय हे गंभीर आहे. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गांभीर्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

  • 29 Jul 2026 09:41 AM (IST)

    महिला बचत गटाचे चोरीला गेलेले 8 लाख 80 हजार रुपये मध्यप्रदेशातून जप्त

    जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर या गावातील जय योगेश्वर महिला बचत गटाच्या महिलां भोकरदन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 9 लाख रुपयांची रक्कम काढून गावाकडे निघाल्या होत्या. मात्र या सर्व महिला चहा पिण्यासाठी थांबल्या असता वेळेचा फायदा काही घेत चोरट्यांनी ही रक्कम पिकअप वाहनातून लंपास केल्याची घटना घटना घडली होती. भोकरदन पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यातून चोरी गेलेल्या 9 लाख पैकी जवळपास 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

  • 29 Jul 2026 09:39 AM (IST)

    मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी

    जायकवाडी धरणातील पाणीसाठा 66.20 टक्क्यांवर. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ. जायकवाडी सरासरी 31 हजार 31 क्युसेक पाण्याची आवक सुरू. मात्र मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही.

  • 29 Jul 2026 08:50 AM (IST)

    60 हजार रुपयांची लाच घेताना राज्यकर विभागाची महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात

    एका व्यक्तीचे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 60 हजार रुपयांची लाच घेताना जालना शहरातल्या वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले,सुवर्णा रामेश्वर लोहिया असं या महिला अधिकाऱ्यांचे नाव असून तिच्यासोबत तिचा खाजगी कर सल्लागारही या जाळ्यात अडकलाय.तक्रारदार व्यक्तीचं जालना शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूचं दुकान असून जीएसटी कार्यालय जालना येथील लाचखोर महिला अधिकारी यांच्याकडून इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक झाल्या प्रकरणी शो कॉज नोटीस प्राप्त झालेली होती.त्यामुळे अनलॉक करण्यासाठी खाजगी कर सल्लागारामार्फत ही लाच मागितलेली होती त्यावेळी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.दरम्यान जीएसटी विभागातीलच महिला अधिकाऱ्यांनी लाच घेतल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे..

  • 29 Jul 2026 08:40 AM (IST)

    शिर्डीत गुरूपोर्णिमेचा उत्साह…

    साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी…साईबाबांना गुरू स्वरूप माणून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक… आज उत्सावाचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी…साई समाधीसह गुरूस्थान मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजले…उत्सवानिमित्त साई मंदिर , गुरूस्थान मंदिर , द्वारकामाई आणि चावडी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट…दाक्षिणात्य पद्धतीने केलेली सजावट भाविकांच लक्ष वेधून घेतेय..आज मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले असणार…साईबाबांची प्रतिमा आणि पादूकांची सुवर्णरथातून निघणार मिरवणूक…

  • 29 Jul 2026 08:30 AM (IST)

    आषाढीनंतर पंढरीत रंगली अनोखी स्वच्छतेची वारी..

    आषाढी एकादशीनंतर पंढरपूरात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवा चेतनाच्या ५५० ते ६०० स्वयंसेवकांनी दोन दिवस विशेष स्वच्छता अभियान राबवले. चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दिंडी तळ, बसस्थानक आणि शहरातील विविध भागांतील सुमारे २ टन प्लास्टिक व कपड्यांचा कचरा गोळा करण्यात आला. अहिल्यानगरचे अमर कळमकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष असून, प्रशासन आणि नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले..

  • 29 Jul 2026 08:25 AM (IST)

    भर पावसाळ्यातही नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

    येवला ,नांदगाव ,बागलाण ,मालेगाव , चांदवड देवळा सह सिन्नर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा. सर्वाधिक 29 टँकरद्वारे येवला तालुक्यात पाणीपुरवठा तर नांदगाव मध्ये 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा. टँकरद्वारे पाणीपुरवठा साठी येवला तालुक्यात चार तर नांदगाव मध्ये नऊ आणि मालेगाव मध्ये 16 विहिरींचे अधिग्रहण. येवला तालुक्यातील टँकरद्वारे ५५ फेऱ्या तर नांदगाव मध्ये 63 आणि मालेगाव मध्ये 33 टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा

  • 29 Jul 2026 08:20 AM (IST)

    नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

    कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शस्त्र व जमावबंदी आदेश केला जारी. नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास आणि रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नसणार. शस्त्र व जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

CJP कडून सरकारला मोठा इशारा देण्यात आला. विद्यार्थ्यांवरील छळ कमी झाला नाही तर आम्ही मोठे आंदोलन सरकारविरोधात करू, असे थेट कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपकेने म्हटले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामध्येच पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला. गडचिरोली आणि नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. आज रेड, ऑरेंज अलर्टही राज्यभरात हवामान विभागाने जारी केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचा आज साखरपुडा आहे. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा पार पडेल. राज्यासह देशातील राजकारणातील घडामोडींना वेग आला. काल सुनील तटकरे यांनी रात्री उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Published On - Jul 29,2026 8:19 AM

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार