AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine Day : गुलाबांच्या फुलांनी सजली बाजारपेठ, शेतकऱ्यांसह फुल विक्रेत्यांचे व्यावसायही बहरले

दररोज 1 हजार ते 2 हजार शेकड्याने गुलाबाची विक्री होते मात्र व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर पाच ते सहा हजार शेकडा याप्रमाणे गुलाबाच्या फुलांची विक्री होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तसेच रंगाच्या फुलांना मोठी मागणी आहे गुलाबाच्या फुलांना समाधानकारक भाव मिळत असल्याने गुलाबाच्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Valentine Day : गुलाबांच्या फुलांनी सजली बाजारपेठ, शेतकऱ्यांसह फुल विक्रेत्यांचे व्यावसायही बहरले
गुलाबाच्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे.Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Edited By: | Updated on: Feb 12, 2024 | 6:49 PM
Share

जळगाव : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो. सध्या वैलेंटाईन वीक सुरू आहे. प्रेमी युगूल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा खास आठवडा साजरा करतात. ‘वैलेंटाईन डे’ला या आठवड्याची सांगता होते. एकमेकांवर प्रेम करणारे आपल्या जोडीदाराला भेटवस्तू देतात. प्रेम आणि शुभेच्छा देण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गुलाबाची फुलं भेट देण्यासाठी तसेच सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. याच कारणामुळे या आठवड्यात गुलाबांच्या फुलाला मोठी मागणी असते. अवघ्या दोन दिवसांवर व्हॅलेंटाईन डे येऊन ठेपला असून ‘व्हॅलेंटाईन डेट’च्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाच्या फुलांना (Rose Flower Demand) चांगलीच मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

गुलाबाच्या फुलांना मिळतोय समाधानकारक भाव

दररोज 1 हजार ते 2 हजार शेकड्याने गुलाबाची विक्री होते मात्र व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर पाच ते सहा हजार शेकडा याप्रमाणे गुलाबाच्या फुलांची विक्री होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तसेच रंगाच्या फुलांना मोठी मागणी आहे गुलाबाच्या फुलांना समाधानकारक भाव मिळत असल्याने गुलाबाच्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येसुद्धा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गुलाब कोणता लागवड करावा आणि कोणत्या महिन्यात लागवड करावा?

पॉलिहाऊस विना गुलाब शेती करता येणारा गुलाबाचा एक नवा प्रकार आला आहे. याला बोरडेक्स गुलाब म्हणतात. हा एक उत्तम पर्याय आहे. जुन आणि जुलै महिन्यात तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गुलाबाची लागवड केली जाते. अडीच बाय पाच फूट अंतरावर एक एकर मध्ये चार हजार रोपे तुम्ही लावू शकता आणि अर्धा एकरमध्ये दोन हजार झाडांची लागवड तुम्ही करू शकता.

गुलाब शेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. एक गुलाबाचे झाड 12 रुपयांना आहे. 25 ते 30 हजार हा अर्धा एकरासाठी खर्च आहे. त्यानुसार तुम्ही लागवड करू शकता.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच