AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाबरवायला गेला अन् गोळीच घातली, उमेदवाराचं काय झालं?; जळगावातील त्या घटनेने…

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर गोळीबाराच्या घटनेमुळे हादरलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचाराच्या रॅली सुरु आहेत. अशा वातावरणात मुक्ताईनगमध्ये अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. पण सुदैवाने बंदुकीतून निघालेल्या गोळ्या या सोनवणे यांना न लागता त्यांच्या गाडीवरुन गेल्या. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

घाबरवायला गेला अन् गोळीच घातली, उमेदवाराचं काय झालं?; जळगावातील त्या घटनेने...
| Edited By: | Updated on: Nov 06, 2024 | 5:12 PM
Share

मुक्ताईनगरमधील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. या मतदारसंघात महायुतीकडून सध्याचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विनोद सोनवणे हे तिसरे अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये तिरंगी लढत बघायला मिळत आहे. तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. पण मंगळवारी (5 नोव्हेंबर) एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. तो प्रकार म्हणजे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या 3 अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. पण सुदैवाने ते बचावले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. यानंतर विनोद सोनवणे यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणी 24 तासांच्या आत कारवाई करत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर काल झालेल्या गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हाकरता वापरलेली पिस्तूल आणि गाडी जप्त केली आहे. या प्रकरणातील आणखी 2 आरोपी हे फरार आहेत. त्या दोनही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. पण संबंधित घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत काय-काय कारवाई केली, याबाबतची माहिती दिली. तीन आरोपींना अटक करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं.

आरोपींनी गोळीबार का केला?

अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी काही जण आले. आमच्याकडे भरपूर लोक आहेत. निवडणुकीत इलेक्शनचं कॅम्पिंग करून मदत करू, असं सांगत त्यांनी अपक्ष उमेदवार सोनवणे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पण सोनवणे यांनी पैसे न दिल्याने त्यांनी धाक दाखवण्याच्या उद्देशाने फायरिंग केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

आरोपींची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसून गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत, अशी माहितीदेखील पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. या प्रकरणी दोन राउंड फायर करण्यात आल्याची तक्रार आहे. पाच आरोपींपैकी दोन आरोपींनी अपक्ष उमेदवाराकडे पैशांची मागणी केली होती. निवडणुकीत काहीतरी पैसे भेटतील या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....