कोरोनाचं संकट वाढलं; जालन्यात लहान मुलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना तातडीने मदत केली जावी म्हणून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. (jalna district administration issued child helpline number due to corona crisis)

कोरोनाचं संकट वाढलं; जालन्यात लहान मुलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 7:56 PM

जालना: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना तातडीने मदत केली जावी म्हणून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. ज्या बालकांना कोरोना झाला आहे आणि ज्यांना कुणीच नाही किंवा ज्या बालकांचे आई-वडील कोरोनाने दगावले आहेत, अशा बालकांच्या संगोपनासाठी आणि उपचारासाठी या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. (jalna district administration issued child helpline number due to corona crisis)

कोरोना झालेल्या ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही किंवा ज्या बालकांचे पालक कोरोनामुळे दगावले आहेत अशा बालकांची माहिती बाल कल्याण समिती, जालना व चाईल्ड लाईन टोल फ्री क्र. 1098 तसेच खालील संपर्क क्रमांकावर देण्यात यावी. जेणेकरुण सदर बालकांना आवश्यक मदत वेळेत पुरवता येईल, असे आवाहन जालन्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

हेल्पलाईन क्रमांक

>> बाल कल्याण समिती टोल फ्री क्रमांक-1098, संपर्क क्रमांक- 9890841439 >> शासकीय मुलांचे बालगृह, शंकरनगर संपर्क क्रमांक- 9404000405 >> जिल्हा बाल संरक्षण कक्ष संपर्क क्रमांक – 7972887043, 8830507008 >> महिला व बालविकास विभाग, मदत कक्ष संपर्क क्रमांक- 8308992222, 7400015518 >> जिल्हा महिला व बालविकास विभाग संपर्क क्रंमाक- 02482-224711

महसूल विभागातील सर्व सुनावण्या बंद

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महसुल विभागाकडून विविध प्रकरणी घेण्यात येणाऱ्या सुनावण्या बंद करण्यात आल्या आहेत. या सुनावण्यांसाठी जिल्हयातील नागरिक मोठया प्रमाणात कार्यालयात ये-जा करत असतात. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपर्कात हे लोक येत असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हयातील सर्व महसूल कार्यालयात होणारी सुनावणी बंद ठेवण्यात येत आहे. येत्या 1 जून 2021 पर्यंत या सुनावण्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी नवे नियम

जिल्ह्यातील लसीकरणाच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. 15 मे 2021 पासून कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या यापूर्वीच्या सूचनामध्ये कोणताही बदल झालेले नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस पूर्वीप्रमाणेच 4 आठवड्यानंतर देण्यात येणार आहे. लसीचे डोस दुसऱ्या डोसची आवश्यकता असणाऱ्यांनाच देण्यात येणार आहे. तसेच इतर लसींचा साठा 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांना पहिला डोससाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लसीकरणे केंद्रावर गर्दी करु नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी केलं आहे.

985 जणांना कोरोनाची लागण

जालन्यात आज 985 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 851 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यता आला आहे. जालना शहरात सर्वाधिक 138 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 58027 झाली आहे. त्यापैकी 2393 व्यक्ती रुग्णालयात भरती आहेत. (jalna district administration issued child helpline number due to corona crisis)

संबंधित बातम्या:

जालना जिल्हा ‘हिरवाई’ने बहरणार; प्रत्येक व्यक्तिमागे तीन झाडे लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ऐकावं ते नवलंच! 16 बायकांचा दादला, 150 मुलं; तरीही गुडघ्याला बाशिंग बाधून तयार!

Maharashtra Coronavirus LIVE Update : वर्ध्यातील कडक निर्बंधांत आणखी पाच दिवसांची वाढ

(jalna district administration issued child helpline number due to corona crisis)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.