रुग्ण वाढल्यास मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरु करा; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रुग्ण वाढल्यास मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर सुरु करा; जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सांकेतिक फोटो

मुलींचे वसतीगृहात आठ दिवसांमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. (Jalna district collector to start Covid Center in the girls hostel)

Namrata Patil

|

Apr 09, 2021 | 4:19 PM

जालना : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात अधिक कोरोना रुग्ण वाढल्यास त्यांच्यासाठी मुलींच्या वसतिगृहात कोव्हिड सेंटर सुरु करा, असे आदेश जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. येणाऱ्या काळात मुलींचे वसतीगृहात आठ दिवसांमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. (Jalna district collector to start Covid Center in the girls hostel)

तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अंबड येथील कोव्हीड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय तसेच लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांची अधिक चांगल्या प्रमाणात काळजी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच कोरोनावरील लस ही अत्यंत सुरक्षित असून प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.

योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होईल, याची काळजी घ्या

त्याशिवाय अंबड येथील कोरोनाबाधित रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. त्याशिवाय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना अखंडितपणे आणि योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा होईल यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लिक्विड ऑक्सिजनचे दोन ड्युरा सिलेंडर अंबडसाठी देण्यात आले आहेत. ते तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

येत्या आठ दिवसात कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना

त्याशिवाय  अंबड येथील मुलांचे वसतिगृह येथे उभारण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष रुग्णांची संवाद साधला. त्यावेळी तुम्हाला आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतात का? जेवणाचा दर्जा चांगला आहे का? आपली आवश्यक ती तपासणी केली जाते का? इत्यादी बाबींची त्यांनी चौकशी केली. तसेच या ठिकाणी असलेल्या रुग्णांची कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच येणाऱ्या काळात अधिकचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यासाठी मुलींच्या वसतिगृहात येत्या आठ दिवसात कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लसीकरण केंद्राला भेट

अंबड शहरातील मत्स्योदरी विद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लस घेणाऱ्या सर्वसामान्यांशी संवाद साधला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली लस ही अत्यंत सुरक्षित आहे. मी स्वत:ही लस घेतली आहे. त्यामुळे अंबडमधील प्रत्येकाने ही लस टोचून घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतराचे पालन करा

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केले. (Jalna district collector to start Covid Center in the girls hostel)

संबंधित बातम्या : 

वास्तव नाकारुन चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे, सहकार्य करा: शरद पवार

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें