शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?

जालन्यात शॉपिंग मॉल आणि सिनेमागृहात जाण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले असून लग्न आणि अंत्यविधीला केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. (jalna District collector issues fresh guidelines in view of rising COVID-19 cases)

शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?
ravindra binwade, Collector & District Magistrate, jalna
भीमराव गवळी

|

Mar 17, 2021 | 9:18 PM

जालना: जालन्यात शॉपिंग मॉल आणि सिनेमागृहात जाण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले असून लग्न आणि अंत्यविधीला केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जालन्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच जालन्यात येत्या 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कोरोना प्रतिबंधक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (jalna District collector issues fresh guidelines in view of rising COVID-19 cases)

तोपर्यंत शॉपिंग मॉल बंद राहतील

आज जारी करण्यात आलेल्या निर्बंधानुसार शॉपिंग मॉलसाठी अनेक बंधने घालण्यात आली आहेत. शॉपिंग मॉलमध्ये योग्यरीत्या मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान मापक यंत्राचा उपयोग करुन ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये, सोईस्कर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवण्यात यावेत, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे याचे नियोजन करण्यासाठी संबंधित आस्थापनेने पुरेशा मनुष्यबळाचा वापर करावा, शॉपिंग मॉल अंतर्गत असलेल्या सिनेमागृहे, चित्रपटगृहे किंवा अन्य आस्थापना असल्यास त्यातही या नियमांचे पालन करण्यात यावे. सदर आस्थापनांमध्ये या नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी शॉपिंग मॉलचीच राहील, असं या आदेशात म्हटलं आहे. तसेच या आदेशाचा भंग केल्यास जोपर्यंत केंद्र सरकारने कोरोना महामारी म्हणून घोषित केली आहे. तोपर्यंत हे शॉपिंग मॉल बंद ठेवण्यात येतील. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सदर शॉपिंग मॉलविरोधात दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.

अंत्यविधीपासून लग्नापर्यंत निर्बंध

जिल्ह्यात सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, मेळाव्यांना प्रतिबंध राहील. लग्न समारंभात 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही. स्थनिक प्रशासन, यंत्रणा यांनी याबाबत खात्री करावी. उल्लंघन झाल्यास, संबंधित, मालमत्ता मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच जागा वा मालमत्ता केंद्र सरकारने कोरोना महामारी म्हणून घोषित केली आहे, तोपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

कोरोना संशयिताच्या घराबाहेर बोर्ड

ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत किंवा ज्यांना कोरोनामुळे होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, अशा रुग्णांच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर किंवा ठरावीक ठिकाणी कोविड-19 रुग्ण असल्याबाबत 14 दिवसांसाठी बोर्ड लावण्यात येणार आहे. तसेच कोविड रुग्णाच्या हातावर शिक्का मारण्यात येणार आहे. ज्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लक्षणे आहेत आणि तो विलगीकरणामध्ये आहे, त्या कुटुंबीतील सदस्यांनी घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीत मास्क लावूनच बाहेर जावे, असंही सांगण्यात आलं असून नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ कोविड सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्याचे आदेशही स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

वर्कफ्रॉम होमला प्राधान्य द्या

सर्व कार्यालये आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता 50 टक्के उपस्थितीत सुरु राहतील. वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य द्यावे. कार्यालयांकडून या निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास सरकारने कोरोना महामारी म्हणून घोषित केली आहे, तोपर्यंत सदर कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. (jalna District collector issues fresh guidelines in view of rising COVID-19 cases)

दर्शनासाठी सूचना

सर्व धार्मिक स्थळांनाही भाविकांच्या दर्शनाचं व्यवस्थापन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी गोष्टींचं भाविकांकडून सक्तीनं पालन करून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. दिवसभरात किती भाविकांना दर्शनाची परवानगी द्यायची? तासाला किती भाविकांना परवानगी द्यायची? आदी गोष्टींचं व्यवस्थापनही मंदिर प्रशासनाला करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणाची व्यवस्था करण्याचा विचार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (jalna District collector issues fresh guidelines in view of rising COVID-19 cases)

संबंधित बातम्या:

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू, सायंकाळी 7 ते सकाळी 7 कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय काय?

कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टर पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ

(jalna District collector issues fresh guidelines in view of rising COVID-19 cases)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें