AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर आता फडणवीस काय बोलणार??

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिय दिली आहे. अगदी थोडक्यात फडणवीस बोलले आहेत मात्र जरांगे काय बोलेल हे एकून ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर आता फडणवीस काय बोलणार??
manoj jarange patil and devendra fadnavis Image Credit source: TV9MARATHI
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 25, 2024 | 4:04 PM
Share

जालना : मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा एनकाऊंटर करायचा असून माझ्याविरोधात फडणवीस षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केले आहेत. अशातच यावर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांनी जरांगे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, जरांगे काय बोलले ते ऐकून मी यावर बोलेल असं फणडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आता काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळावरून देवेंद्र फणडवीस यांच्यावर आरोप करत मुंबईमध्ये सागर बंगल्याच्या दिशेने येण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पायी निघाले होते  पण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून ते उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मराठा बांधव त्यांना मुंबईला जावू नक अशी विनंती करत आहेत. मात्र जरांगे आता गाडीमध्ये बसले असून ते सागर बंगल्यावर येण्यासाठी ठाम आहेत.

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  मात्र भाजप नेत्यांनीही आता आक्रमक भमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.

नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...