Jalna | घनसावंगी तालुक्यात विजेच्या धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू …

| Updated on: Aug 16, 2022 | 3:01 PM

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्का लागल्याने घोड्याचा मृत्यू झालायं. मंदिराजवळील ट्रान्सफार्मर भोवती पावसामुळे झाडे वेलीनी विळखा घातल्याने जमिनीवर विद्युतप्रवाह उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Jalna | घनसावंगी तालुक्यात विजेच्या धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू ...
Follow us on

जालना : घनसावंगी (Ghansawangi) तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू झालायं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालीयं. घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ रामदासांचे जन्मस्थान असलेल्या मंदिराजवळ घोड्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यूची (Death) घटना उघडकीस आलीयं. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे करंट लागून घोड्याचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी महावितरणविरोधात संताप व्यक्त केलायं. तसेच घोड्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई (Action) करण्याची मागणी समस्त ग्रामस्थांकडून केली जातंय.

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे विजेच्या धक्का लागल्याने घोड्याचा मृत्यू झालायं. मंदिराजवळील ट्रान्सफार्मर भोवती पावसामुळे झाडे वेलीनी विळखा घातल्याने जमिनीवर विद्युतप्रवाह उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ट्रान्सफार्मर भोवती वेली आणि झाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने विद्युतप्रवाह खाली उतरला होता.

हे सुद्धा वाचा

विद्युतप्रवाह खाली उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू

ट्रान्सफार्म भोवती वेलींनी विळखा घातलायं. यासंबंधीत अनेकदा ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने आज घोड्याचा मृत्यू झालायं, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. याठिकाणावरून दररोज अनेकजण ये-जा करतात. यामुळे आता तरी महावितरण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.