AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : …म्हणून मी उपोषण मागे घेतलं; मुख्यमंत्र्यांसोबतच्या 10 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली?

Manoj Jarange Patil on Uposhan Maratha Reservation CM Eknath Shinde : ...म्हणून मी उपोषण मागे घेतलं; 17 व्या दिवशी उपोषण मागे का घेतलं? मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर सांगितलं, काय म्हणाले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? वाचा...

Manoj Jarange Patil : ...म्हणून मी उपोषण मागे घेतलं; मुख्यमंत्र्यांसोबतच्या 10 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली?
| Updated on: Sep 14, 2023 | 1:13 PM
Share

जालना | 14 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत काय बोलणं झालं. याबाबत जरांगे पाटील यांनी माहिती दिली. आपण मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहोत. एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण सोडण्यासाठी चर्चा केल्याची पहिलीच घटना आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली.

मराठा आरक्षण हा तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. 29 तारखेला आपलं आंदोलन सुरु झालं. तेव्हापासून मी सांगत होतो की, आपल्याला कुणी न्याय देऊ शकेन तर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच… आणि आज त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. आज ते या ठिकाणी आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणालेत. मला विश्वास आहे ते आपल्याला न्याय देतील. फक्त टिकणारं आरक्षण आम्हाला द्या. आमच्या समाजाला त्याचा उपयोग होईल, असं मनोज जरांगे म्हणाले.

17 व्या दिवशी जरांगे यांचं  उपोषण मागे

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागच्या 17 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांनी सरकार समोर पाच अटी ठेवल्या होत्या. या अटींची पूर्तता करावी. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून आपल्याला आश्वासन द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहात मनोज जरांगे पाटील यांना आणि मराठा समाजाला आश्वस्त केलं आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस घेत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत शिंदे यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली. यावेळी मीही सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करत राहील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.