AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा पोरांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप

Manoj Jarange Patil on CM Ekanath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : शिंदे सरकारवर मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा पोरांविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा आरोप
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 27, 2023 | 3:38 PM
Share

जालना | 27 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारवर सर्वात मोठा आरोप केला आहे. मराठा समाजातील तरुणांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला अपेक्षा होती. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. पंतप्रधानांना आरक्षणाबाबत काही सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण त्यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा पंतप्रधानांना सांगितलं नाही अशी शंका आहे. जर पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत सांगितलं असेल तर पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का. याची शंका आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काल मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही. सांगितलं असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय घेतला नाही. ही शंका आहे. पंतप्रधांनाना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा त्यातून राज्यातील जनता अर्थ काढत आहे. पंतप्रधानांनी काल विषय घ्यायला हवा होता. पण दोन्ही बाजूच्या चर्चा सुरू आहेत. एक तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून सांगितलं नाही. किंवा पंतप्रधानांना सांगितलं पण त्यांनी जाणूनबुजून आरक्षणाचा विषय घेतला नाही. या दोन्ही शंकापैकी एक शंका मराठ्यांच्या मनात शंभर टक्के आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलन घेत नाही याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांनी घेतला नाही. त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय मराठ्यांना फरक पडत नाही. पण समाज यासाठी शांत होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि राज्य सरकारला हा विषय मार्गी काढायला सांगतील. मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील. तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं, असं म्हणत जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच