AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna | उलटा चोर कोतवाल को डाटे, Raosaheb Danve यांच्या वक्तव्याची Abdul Sattar यांच्याकडून खिल्ली

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये म्हणून दानवे खोटं बोलत आहेत.

Jalna | उलटा चोर कोतवाल को डाटे, Raosaheb Danve यांच्या वक्तव्याची Abdul Sattar यांच्याकडून खिल्ली
शिवसेना नेते अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना टोलाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 19, 2022 | 1:16 PM
Share

जालनाः भाजप नेते रावासाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचं नाराज आमदारांबाबतचं वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, या म्हणीसारखं आहे, असा टोला शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारचे  (Mahavikas Aghadi MLA) 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची आमदारकी धोक्यात येऊ नये, म्हणून नावे उघड करत नाहीये, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यानंतर आता जालन्यातले शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये म्हणून दानवे खोटं बोलत आहेत. भाजपचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे सत्तार म्हणाले. दानवे यांचा गौप्यस्फोट म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे.. असंत आहे, अशी खिल्ली सत्तार यांनी उडवली. आज जालन्यात पंचायत समिती कार्यालयाचे सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

MIM चा निर्णय वरिष्ठ घेतील- सत्तार

दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये यावं की नाही, याबाबत मी प्रतिक्रिया देणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील.

रावसाहेब दानवे यांचं काय वक्तव्य?

महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधील 25 आमदार बहिष्कार घालणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढली गेली, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

इतर बातम्या-

Aurangabad | नाराज आमदारांना भाजपची खुली Offer, औरंगाबादेत Dr. Bhagwat Karad यांचं वक्तव्य!

MIMला आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, राजेश टोपेंच्या विधानाने शिवसेनेची कोंडी?

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं