AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : वातावरण थंड होऊ देऊ नका… जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढा; मनोज जरांगे यांची मराठ्यांना हाक; बीडचं लोण आता राज्यभर

Manoj Jarange Patil Big Statements : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज बीडमध्ये मोर्चा निघत आहे. त्यापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेले आहे. त्यांनी हे प्रकरण तापत ठेवण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे.

Manoj Jarange : वातावरण थंड होऊ देऊ नका... जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढा; मनोज जरांगे यांची मराठ्यांना हाक; बीडचं लोण आता राज्यभर
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh
| Updated on: Dec 28, 2024 | 10:00 AM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज बीडमध्ये मोर्चा निघत आहे. त्यापूर्वी हे खून प्रकरण आता तापले आहे. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज बीडमध्ये थोड्याच वेळात मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेले आहे. त्यांनी हे प्रकरण तापत ठेवण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात मोर्चे काढा, अशी हाक त्यांनी मराठा समाजाला दिली आहे.

एकाने पण घरी थांबू नका

बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मोर्चा आहे. संतोष देशमुख यांच्या लेकीने हाक दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि जनतेने आणि सगळे मराठ्यांना विनंती आहे एकाने पण घरी थांबू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर, आम्ही त्यांना जाग आणणार. कुणाच्या पण बापाला येऊ द्या, हे मॅटर मात्र मी दाबू देणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

लाज वाटू द्या, राजकारण कशाला करता

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी, महायुती असं राजकारण करणार्‍यांवर आसूड ओढला. ते जसे एकमेकांचे राजकारण काढत आहे. त्याच्या विरोधात समाज जाईल. यात राजकारण करू नये, मग महायुती किंवा महविकास आघाडी यांनी राजकारण करू नये. लाज वाटू द्या. महाविकास आघाडी असो की महायुतीमुळेचे हाल होऊ लागले आहेत असा आरोप त्यांनी केला.

काही मंत्री आहेत काही विरोधी पक्षातले आहेत. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करा. संतोष देशमुख यांचा खून झालाय, याच राजकारण कोणीही करू नका, मोर्चात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात हलगर्जी पणा नाही केला पाहिजे, जातीयवाद पसरेल असं काम करू नका, जातीयवाद कसा नष्ट होईल यासाठी काम करा, असे ते म्हणाले.

जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चा काढा

आज बीडचा मोर्चा शांततेत होणार, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चे काढा. मोर्चाची एक तारीख होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन जरांगे यांनी केले. जर सरकारने आरोपींना नाही धरलं तर मराठे तपास हातात घेणार. तुम्ही नुसतं म्हणतात आम्ही आरोपीला सोडणार नाही, अरे आरोपीला धरणार केव्हा? असा सवाल त्यांनी केला. हा मोर्चा जनतेचा आहे, कोणाच्या नेतृत्वात नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

मुख्यमंत्री तुम्ही तोंडघशी पडणार, तुम्ही ज्यांना वाचवतात त्यामुळे तुम्ही तंगडी वर करून पडताल. मुख्यमंत्री मराठे तुमच्या विरोधात जातील. मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत, आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करत आहेत. मी कोणतंच मॅटर दाबू देणार नाही. तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का? आम्ही तुमची गुंडगिरी मोडून काढू शकतो. मुख्यमंत्री तुम्ही ॲक्शन मोडवर या, असे आवाहन त्यांनी केले.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.