Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?
Manoj Jarange Patil: सरकारचे शिष्टमंडळाने लगबगीने आज आंतरवाली सराटी जवळ केली. डझनभर प्रतिनिधी सराटीत दाखल झाले. दोन ते तीन तास चर्चेचे गुऱ्हाळं झालं. पण सरकारच्या हाती फार काही लागलं नसल्याचे समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धडकी भरवणारी घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नांना सरकारी शिष्टमंडळाला यश आले नसल्याचे दिसले. आज लगबगीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी गाठली. पाटलांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्याचेही मान्य केले. त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन दिले. या इतक्या गुळपिठानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी गुढी दिली नाही. त्यांनी सरकारला धडकी भरवणारी घोषणा केली. पाटील 29 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनावर ठाम आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचे पाच प्रश्न
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर शिष्टमंडळाशी चर्चा करताना मनोज जरांगे पाटील यांनी पाच प्रश्न विचारले. आपल्या मागण्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आहे, आपल्या मागण्या आपण सांगितले आहेत.
1) आठवण लाख कुणबी नदी तुम्ही शोधले आहेत त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या, यापूर्वी जे प्रमाणपत्र दिले आहेत त्याचा डाटा द्या आणि इथून पुढे राहिलेले द्या.
2) ज्या बांधवांनी व्हॅलेडीटी साठी अर्ज केले ते जाणीवपूर्वक रोखून ठेवलेत.
3) सातारा, हैदराबादचा जीआर काढला तो खरा काढला की खोटा काढला असं विचारलं.
4) त्यांनी जीआर काढला होता मराठ्यांना ओबीसी सवलती त्या सवलती लागू झाल्या नाहीत, ते 28 तारखेच्या आत लागू करा.
5) केसेस वर चर्चा केली त्यांनी काहीतरी सांगितलं तेराशे मागे घेतल्या.
29 तारखेला निर्णायक आंदोलन
58 लाख कुणबी नदी तुम्ही शोधले आहेत त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या, यापूर्वी जे प्रमाणपत्र दिले आहेत त्याचा डाटा द्या आणि इथून पुढे राहिलेले द्या. ज्या बांधवांनी व्हॅलेडीटी साठी अर्ज केले ते जाणीवपूर्वक रोखून ठेवलेत. सातारा, हैदराबादचा जीआर काढला तो खरा काढला की खोटा काढला असं विचारलं. त्यांनी जीआर काढला होता मराठ्यांना ओबीसी सवलती त्या सवलती लागू झाल्या नाहीत, ते 28 तारखेच्या आत लागू करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
EWS नियुक्ती बाबत चर्चा केली. माझ्या बलिदान दिलेला बांधवांचा निधीचा विषय राहिला. ज्यांच्या नोंदी सापडल्या मात्र प्रमाणपत्र देत नाहीत त्यांनी आंतरवाली या. ज्यांना व्हॅलेडीटी मिळाली नाही त्यांनी कागदपत्र घेऊन आंतरवाली या. ज्या बांधवांचे व्याज पडतावे थांबले त्या बांधवांनी 28 तारखेला ते आम्हाला जमा करून घ्यायचे आणि चर्चा करायची. सारथी, पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून ज्या शिष्यवृत्ती राहिल्या योजना ते सांगा. आंदोलन थांबणार नाही. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार असे जरांगे पाटील म्हणाले.
अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र देत नाही कुणबी प्रमाणपत्र दिले तर व्हॅलेडीटी देत नाहीत तुम्ही सगळे अर्ज घेऊन येते या. जर विद्यार्थ्यांना येथे येत नसेल तर वडिलाला भावाला पाठवा. मराठा समाजाने खडबडून जागा व्हा, सामान्य मराठ्यांनी लेकरा बाळासाठी घराच्या बाहेर पडा. यावेळेस मराठा घरात राहता कामा नये, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
उपसमितीची बैठक अंतरवालीत घ्या
मी मागणी केली नाही, आम्हाला समोर कळू द्या असं म्हटलं आहे, अधिकाऱ्यांना अडचण येत आहे का सरकार अडचणीत आणत आहे हे कळू द्या. सरकारने जर आदेश दिले असतील तर अधिकारी का थांबत आहेत. सरकार जर मुद्दाम करत असेल तर आम्हाला कळू द्या, अधिकारी करत असेल तर आम्हाला कळू द्या त्यामुळे अधिकाऱ्यांना बोलवा. मराठा उपसमितीची बैठक अंतरवाली सराटीत घ्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.