
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार मोर्च होत आहे. सायंकाळी 4 वाजता मोर्चा आणि सभा होईल. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या मराठा-कुणबी जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चापूर्वीच छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी दिसली. आता जरांगे पाटील यांनी बीड मध्ये निघणार मोर्चा ओबीसींचा नाही, विशिष्ट जातीचे लोक त्या मोर्चाला येणार आहेत असा आरोप केला आहे. काय म्हणाले जरांगे?
हा विशिष्ट जातीचा मोर्चा
बीड मध्ये निघणार मोर्चा ओबीसींचा नाही, आणि लोकांचा गैरसमज आता निघाला आहे. राजकीय काम करणाऱ्यांचा निघत नाही. या मोर्चाला काही विशिष्ट जातीचे लोक उपस्थित राहणार आहेत, कारण ओबीसींच्या लक्षात आले आहे की हा मोर्चा आपल्या फायद्याचा नाही. त्यांच्या लक्षात आले आहे, आपले आरक्षण घेऊन आपल्याला खाऊ देत नाहीत किती अपऱ्या बुद्धीचे लोक आहेत. तुम्ही 32 टक्क्यामध्ये एकमेकाला भाऊ मानायला पाहिजे होते. त्यांचे आरक्षण घेऊन त्यांच्याच लेकराला खाऊ दिले नाही. हे किती विचित्र आहेत हे ओबीसींच्या लक्षात आले आहे. हा ओबीसींचा मोर्चा नाही विशिष्ट जातीचे लोक त्या मोर्चाला येणार आहेत. बीड मध्ये निघणारा मोर्चा हा राजकीय स्वार्थासाठी आहे, हा मोर्चा ओबीसी हितासाठी नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी या मोर्चावर केली.
देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस यांना हे जीतके अडचणीत आणता येईल आणि डॅमेज करता येईल, हे पुरेपूर आतून प्रयत्न सुरू आहेत. फडवणीस याना आंबळीत चोभाळीत आहेत आणि त्यांना गुलू गुलू बोलतात. पण त्यांचा कावा आणि त्यांचे विषारी विचार, हे ते अंमलात आणतात, देवेंद्र फडणवीस यांना कसा फटका बसेल याचे काम ते करत आहेत, आणि त्यासाठी बीडचा मोर्चा आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
हा राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा
हा राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा दिसत आहे. कारण त्या मोर्चात सर्व अजित दादांचे लोक त्यामध्ये दिसतात. सरकारने जीआर काढला आणि सरकारमधील लोक त्या विरोधात जातात, आणि याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण फडवणीस यांच्या बाळाशिवाय हे सर्व होऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जर सांगितले की सरकारने हा जीआर काढला आहे, तर तुम्ही त्या विरोधात मोर्चा कसे काढतात, तर यांची मोर्चा काढायची टप्पर नाही.
फडणवीसांवर आमचा विश्वास
आम्हाला वाटते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाची मने जिंकली आहेत. मराठवाड्यातील मराठा सर्व कुणबी आहे आणि त्यांना प्रमाणपत्र वाटप व्हायला पाहिजे. आम्हाला शंका येऊ नये की हे सर्व देवेंद्र फडवणीस घडवून आणतात काय. देवेंद्र फडवणीस बोलले तर कोणात मोर्चा काढायची हिंमत नाही, देवेंद्र फडवणीस यांनी दुहेरी वागू नये असे आम्हाला वाटते. सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला शंका नाही आम्हाला पक्के माहिती आहे त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ठरवले आहे. देवेंद्र फडणीस यांना गोरगरीब मराठ्यांचा आयुष्य उद्देश करण्याची इच्छा नसावी असे आम्हाला वाटते आणि म्हणून त्यांनी जीआर काढला आहे आणि तोही हैदराबाद गॅजेट चा आधार घेऊन काढला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळांवर टीका
जर हैदराबाद गॅजेट सांगत असेल की मराठा हा कुणबी आहे तर ते गेले कुठे ते तरी आम्हाला दाखवावे. आज आम्हाला कळेल आणि मराठ्यांच्या लक्षात येईल कोणत्या कोणत्या नेता आज व्यासपीठावर गेला आहे गावचे कोण कोण गेलेत. ओबीसींना आरक्षण मिळू नाही म्हणून मराठा समाज मोर्चात गेला नव्हता आणि आपण मोर्चे काढले पण नव्हते मग हा का एवढा उतावळा झाला आहे आज मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून हा बीडच्या मोर्चामध्ये सहभागी झाला होता, अशी भुजबळांचे नाव घेता मनोज जरांगेंनी टीका केली.
आज गावागावातील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील मराठ्यांचे डोळे उघडणार आहेत आणि राज्यभरातील मराठ्यांची डोळे उघडणार आहेत. कोण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य कोण उभे राहणारे कोण सभापती कोणता आजी-माजी आमदार या मोर्चाला गेला आहे खासदार या मोर्चाला गेला आहे आणि आज मराठ्यांचे डोळे उघडणार आहे. मराठ्यांनी आता जीआर साठी लढले पाहिजे आणि त्यातल्या त्यात बीडचे मराठे तर अस्सल आहेत आणि ते पुढे दिसून येत दिसून येईल. बीडचे मराठा कसे एकजूट आहेत थोड्या काळात दिसून येईल, असे जरांगे म्हणाले.