तिसरी लाट ही माळा काढणाऱ्यांसाठीच म्हणणाऱ्या इंदुरीकरांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा काय सल्ला?

इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, निवृत्ती महाराजांनी जे वक्तव्य केले आहे, त्या बद्दल त्यांचा हेतू चांगला असावा, पण शाकाहारात पण प्रोटीन घेता येतात...

तिसरी लाट ही माळा काढणाऱ्यांसाठीच म्हणणाऱ्या इंदुरीकरांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा काय सल्ला?
इंदुरीकर महाराजांना आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

जालनाः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. पण त्यातून तुम्ही-आम्ही वाचलो. भाग्यवान आहोत. त्यामुळे हा आपला जन्म नाही तर पुनर्जन्म असल्याचं विधान ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांनी केलंय. तसेच मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आक्षेप घेतला. कीर्तनातून इंदुरीकर महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी इंदुरीकर महाराजांना सल्ला दिलाय.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले..

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर महाराजांना जालन्यात सल्ला दिला आहे. इंदुरीकर महाराज हे शाकाहारी आहेत आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी डॉक्टरने दिलेले सल्ले हे चाचण्या करून घेतलेले असतात. निवृत्ती महाराजांनी जे वक्तव्य केले आहे, त्या बद्दल त्यांचा हेतू चांगला असावा, पण शाकाहारात पण प्रोटीन घेता येतात, असा सल्लाही त्यांनी दिलाय. यासोबतच कीर्तन करताना आपला हेतू मात्र पॉझिटिव्ह असला पाहिजे अशी सूचनाही राजेश टोपे यांनी केलीय.

यापूर्वीही टोपेंनी घातली होती समजूत

यापूर्वीदेखील नोव्हेंबर 2020 मध्ये इंदुरीकर महाराजांनी मी कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं नाशिकच्या कीर्तनात जाहीर केलं होतं. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर महाराजांची भेट घेतली होती. जालन्यातील वाकुळणी इथं महाराजांच्या कीर्तनस्थळी राजेश टोपे गेले होते. तसेच त्यांची समजूतदेखील काढली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन कीर्तनातून करणार असल्याचं वचन दिलं होतं. आता पुन्हा एकदा नवं वक्तव्य करुन इंदुरीकर महाराजांनी वाद निर्माण केला आहे.

इतर बातम्या-

ग्राहक हितासाठी एसबीआय करणार व्यवहारांमध्ये बदल, ‘हे’ नियम पुढील महिन्यापासून बदलणार 

Nagpur | पशुसंवर्धन मंत्र्यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी; सुनील केदार यांनी काय केल्यात घोषणा?


Published On - 2:15 pm, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI