AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnvis : आवडती गायिका कोण ? पत्नीसमोरच जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना फुलटॉस, पण मुख्यमंत्र्यांनी थेट…

या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, मात्र त्यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक फुलटॉस प्रश्न टाकला, पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं,त्यांनी थेट सिक्सरच मारल्याचे दिसले.

Devendra Fadnvis : आवडती गायिका कोण ? पत्नीसमोरच जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना फुलटॉस, पण मुख्यमंत्र्यांनी थेट...
जयंत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची फडणवीसांची मुलाखतImage Credit source: social media
| Updated on: Mar 20, 2025 | 10:06 AM
Share

राज्यात सध्य महायुती वि महाविकास आघाडी असं राजकीय वातावरण असलं तरी सत्ताधारी आणि विरोधक हे बाहेर एकमेकांशी खेळीमेळीनेही बोलत असतात. सौहार्दाचं वातावरण असतं. असंच काहीस दृश्य मुंबईतील एका कार्यक्रमात दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. विविध विषयांवर बोलताना काहीश्या सीरियस झालेल्या या मुलाखतीत नंतर रॅपिड फायर राऊंडही आला, तेव्हा जयंत पाटील यांनी पडणवीस यांना काही थेट तर काही तिरके प्रश्नही विचारले, पण मुख्यमंत्र्यांनी त्या खुबीने उत्तरं दिली. या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, मात्र त्यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक फुलटॉस प्रश्न टाकला, पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं,त्यांनी थेट सिक्सरच मारल्याचे दिसले.

तुमचे आवडते गायक आणि आवडती गायिका कोण ?असा तो सवाल होता, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय उत्तर दिलं जाणून घेऊया. लोकमतच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. बायकोसमोर असे प्रश्न विचारता का ? असं मिश्किल उत्तर फडणवीस यांनी दिलं. पण आपले आवडते गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका या अमृता फडणवीस असल्याचं सांगत त्यांनी थेट सिक्सर मारली.

जयंत पाटील यांची देवेंद्र फडणवीसांसोबत रॅपिड फायर  

प्रश्न : बँटेगे तो कँटेगे की दोघापैकी तर पढेंगे तो बँढेगे एक निवडा ?

उत्तर : आपण एक राहिलो तर विकास होईल त्यामुळे बटेंगे तो कटेंगे

प्रश्न : अमित शाह आणि मोदी कुणासोबत कम्फर्टेबल ?

उत्तर : तुमच्यासोबत माझा कम्फर्ट जास्त. मोदी आणि शाह मोठे आहेत.

प्रश्न : तुमचा आवडता पोशाख कोणता, जॅकेट की हुडी काय आवडतं ?

उत्तर : माझा आवडता पोशाख जॅकेट आहे, पण कधी कधी हुडी घालायलाही मला आवडतं

प्रश्न : अजित पवार कि एकनाथ शिंदे दोघापेकी जवळचं कोणं ?

उत्तर : दोघेही माझ्याजवळचे आहेत. एकनाथ शिंदेसोबत माझी आधी दोस्ती झाली. तर अजित पवारांसोबत नंतर दोस्ती झाली.पण दोघेही माझ्या जवळचे आहेत.

प्रश्न : नागपूर कि मुंबई ?

उत्तर : नागपूर

प्रश्न : आवडता गायक आणि गायिका कोण ?

उत्तर : बायकोसमोर असे प्रश्न विचारता, माझे आवडते गायक किशोर कुमार आणि माझी आवडती गायीका अमृता फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानंतर एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा