बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही मिळाले हा विषय गौण, आता विषय महत्वाचा विषय कोणता, जयंत पाटील म्हणाले…

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडू यांच्यावर टीका करत असतांना शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही मिळाले हा विषय गौण, आता विषय महत्वाचा विषय कोणता, जयंत पाटील म्हणाले...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 8:39 PM

सांगली : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना चिमटा काढला आहे. किराणा वाटपावरुन सुरू असलेल्या वाद खोक्यापर्यन्त जाऊन ठेपला आहे. याच मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्यांनी बच्चू कडू यांच्यासाठी मंत्री पद महत्वाचा विषय गौण आहे, त्यांनी खोके घेतले की नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल. त्यातून ते क्लीन होऊन बाहेर येणं महत्वाचे असल्याचे म्हणत राणा आणि कडू यांच्या वादात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी 1 तारखेपर्यन्त राणा यांना मी खोके घेतले की नाही हे सिद्ध करण्यासाठी वेळ दिला आहे. त्यावरूनच बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खरंतर दिवाळी निमित्त किराणा वाटपावरुन राणा यांच्यावर कडू यांनी टीका केली होती, त्यावर राणा यांनी पलटवार करत असतांना बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतल्याचा आरोप केला होता.

दिवाळी निमित्ताने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून गरिबांना किराणा वाटप सुरू होते.

त्यावर बच्चू कडू यांनी टीका करत असतांना खिसे कापून किराणा वाटायला काय लागते असे म्हणत राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती.

हे सुद्धा वाचा

त्यावरच रवी राणा यांनी आम्ही आमदार होण्याच्या आधीपासून किराणा वाटतो, बच्चू कडूने एक किलो तरी साखर वाटून दाखवावी असं आव्हान केले होते.

याच वेळी रवी राणा यांनी बच्चू कडू हे तोडीबाज माणूस आहे, आंदोलन करून तोडी करतो, आमदार, खासदार निवडणुका आले की पैसे घेतो अशी टीका केली होती.

याच दरम्यान बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले तेव्हा पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता, मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले कडू यांच्यावर असा आरोप झाल्याने कडू हे आक्रमक झाले होते.

राणा कुटुंबाला त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करा यासाठी 1 नोव्हेंबर पर्यन्तची मुदत दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कडू यांनी म्हंटले होते.

याच दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडू यांच्यावर टीका करत असतांना शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.