AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आराखडा तातडीने सादर करा, जयंत पाटलांचे कुणाला आदेश?

जिल्हा प्रशासन या संदर्भातील विविध यंत्रणांकडून सर्व परवानग्या घेण्यासाठी तातडीने प्रयत्न करेल. येत्या 8 ते 10 दिवसात आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून घेवूया व लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा बसवूया, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आराखडा तातडीने सादर करा, जयंत पाटलांचे कुणाला आदेश?
जयंत पाटीलांकडून पुतळा बसवण्याच्या कामाला वेग
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 5:12 PM
Share

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapti Shivaji Mahraj) हे सर्वांचेच स्फूर्तीचे व आदराचे स्थान आहे. त्यांचा पुतळा बसविताना त्याचे पावित्र्य राखले जावे. यासाठी आवश्यक सर्व परवानग्यांची पूर्तता करून घेण्यासाठी पुतळा समितीने परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तातडीने सादर करावा. जिल्हा प्रशासन या संदर्भातील विविध यंत्रणांकडून सर्व परवानग्या घेण्यासाठी तातडीने प्रयत्न करेल. येत्या 8 ते 10 दिवसात आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून घेवूया व लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा बसवूया, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. यावेळी पुतळ्याचे ठिकाण हे राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने नॅशनल हायवे ॲथॉरिटी (National highway authority) कार्यालयाने बायपास रस्त्यासाठी त्वरीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जयंत पाटील यांनी यावेळी दिले. त्यामुळे या पुतळ्याच्या कामाल गती प्राप्त झाली आहे.

पुतळ्यासाठी पाटलांची विशेष बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, सार्वजनिक बांधकम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, तहसिलदार जीवन बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्री. सांगावकर, पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप तसेच सदस्य आदि उपस्थित होते.

दहा दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करूया

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रशासनाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेवून पुढील 8 ते 10 ‍दिवसांमध्ये पुतळा बसविण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगींची पुर्तता करून घेवूया. प्रशासनाने कला संचालनालय, मुख्य वास्तू विशारद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह संबंधित सर्व यंत्रणांकडून याबाबतच्या परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा. पुतळ्याच्या संरक्षणासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवावा. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर पुतळा बसवित असताना तो रस्त्याच्या मध्यभागी असल्याने कोणत्याही वाहनाच्या माध्यमातून त्यास हानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सैन्य तयार ठेवा, 2024मध्ये आपल्याला जिंकायचंय; जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन

भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त भाजपवर, हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटलांचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.