अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान

शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या 'ग्लोबल टीचर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (teacher 7 crore award)

अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 11:14 PM

सोलापूर : जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या ‘ग्लोबल टीचर’ या पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. 7 कोटी रकमेचा हा पुरस्कार युनेस्को आणि वर्की यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. (Jilha Parishad teacher from  solapur will be honoured by the global award of 7 crore rupees)

या पुरस्काराची घोषणा गुरुवारी (3 डिसेंबर) करण्यात आली. यावेळी रणजितसिंह डिसले यांची निवड करताना तब्बल 140 देशांतील शिक्षकांचे नामांकन झाले होते. या सर्व शिक्षकांपैकी रणजितसिंह यांना हा पुरस्कार मिळण्याचा सन्मान लाभला. यावेळी जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

यावेळी रणजितसिंह डिसले यांच्यासोबत तब्बल 140 देशांतील 12 हजारपेक्षा जास्त शिक्षक या पुरस्कराच्या शर्यतीत होते. डिसले यांनी QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनव क्रांती केली. त्यांच्या याच कामाची युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन या संस्थांनी दखल घेत, त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.

पुरस्कारातील 50 टक्के रक्कम इतर शिक्षकांना

रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे, 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या 9 शिक्षकांचादेखील सन्मान होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. तसेच, हा राज्यातील सर्व शिक्षकांचा गौरव असल्याची भावना रणजितसिंह यांनी व्यक्त केली आहे.  (Jilha Parishad teacher from solapur will be honoured by the global award of 7 crore rupees)

संंबंधित बातम्या :

नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा ‘महात्मा फुले समता पुरस्काराने’ गौरव

ICC Decade Awards | आयसीसी दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडणार, विराट कोहलीला ‘या’ पाच पुरस्कारांसाठी नामांकन

पद्मविभूषण पुरस्काराच्या सन्मानावेळी तुमच्या आठवणींनी गहिवरलो, शरद पवारांचं आईला भावनिक पत्र

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.