मुख्यमंत्र्यांचं हृदयाचं ऑपरेशन, तरीही राज्यासाठी योद्ध्याप्रमाणे लढत आहेत : जितेंद्र आव्हाड

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असताना ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मदतीला आहेत", असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं हृदयाचं ऑपरेशन, तरीही राज्यासाठी योद्ध्याप्रमाणे लढत आहेत : जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 4:41 PM

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असताना ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मदतीला आहेत”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) म्हणाले. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत गांभीर्याने निर्णय घेत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री वारंवार आढावा घेत आहेत. त्यांच्या याच कामांचं जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी कौतुक केलं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं असताना ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासारखी व्यक्ती मदतीला आहेत. त्यांची आई आजारी असताना ते लोकांसाठी काम करत आहे. त्यांच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा. काही दिवस घरी थांबा, आई वडिलांशी बोला, पुस्तकं वाचा”, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

हेही वाचा : कोरोना vs ठाकरे सरकार : दिवसभरातील महत्त्वाचे निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलं आहे. राज्यभरातील विविध ठिकाणातील दुकानं, आठवडी बाजार वगैरे बंद ठेवण्याचा निर्णय स्वत: व्यापाऱ्यांनी घेतल्याचं समोर आलं आहे. या दरम्यान रोजगाराचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी चिंता काही लोकांकडून व्यक्त केली जात आहे. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

“सर सलामत तो पगडी पचास, कोरोनाच्या पार्श्नभूमीवर बंदी दरम्यान रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण एकवेळ उपाशी राहिलं तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. त्यामुळे आपण कोरोनाची लढाई नीट जिंकू शकतो”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुंबई MMRDA भाग, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, वैद्यकीय सुविधा, बँक अशा जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सर्व कार्यालये बंद राहतील, ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता 50 टक्क्यांवरुन 25टक्क्यांवर आणणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

सध्या जगात अशी वेळ आलीय, जगण्यासाठी घरात थांबणं आवश्यक आहे. पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. संपर्क टाळणे हे एकमेव शस्त्र आहे. मात्र आपल्या काळजीपायी अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्र सरकार काही निर्णय घेत आहे. कदाचित आपल्याला रुचणार नाही. रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस आपण वापरत आहोत, ती कारणं आपण बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कोरोनाविषयक चित्रपट मुख्यमंत्री कार्यालय ट्वीटरवर शेअर केला, जरूर पहा. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयुषमान खुराणा, आलिया भट, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनी योगदान दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 52 रुग्ण आहेत, मात्र 5 रुग्ण आता व्हायरसमुक्त झाले आहेत. त्यांच्यावर पुढील 14 दिवस देखरेख ठेवली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. त्यावर मात करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत, त्यांचा पगार मालकांनी कापू नये, माणुसकी टिकवण्याची वेळ आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

ही फिरण्याची सुट्टी नाही, सर्वांनी घरी बसून काळजी घ्यावी. काही लढाया रणांगणात लढाव्या लागतात, आपण घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.  तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच होतील. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.

दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.

कोणकोणत्या परीक्षा रद्द?

  • पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
  • नववी ते अकरावी  – 15 एप्रिलनंतर परीक्षा
  • दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील.
  • पेपर तपासणी 31 मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल
  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गुण संकलन करुन निकाल दिला जाईल
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम (दहावी वगळून)

संबंधित बातम्या : Corona | ‘बेबी डॉल’ गायिका कनिका कपूरला कोरोना, विमानतळावरुन पळाल्याचा आरोप

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.