AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराड ज्या कारागृहात बंदिस्त, ‘त्या’ ठिकाणी रात्री काय घडतं? जितेंद्र आव्हाडांकडून पोलखोल

वाल्मिक कराडवर २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचेही आरोप आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत खळबळजनक दावा केला आहे.

वाल्मिक कराड ज्या कारागृहात बंदिस्त, 'त्या' ठिकाणी रात्री काय घडतं? जितेंद्र आव्हाडांकडून पोलखोल
jitendra awhad walmik karad (1)
| Updated on: Jan 27, 2025 | 9:37 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यांपेक्षा जास्त दवस उलटले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर २० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचेही आरोप आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत खळबळजनक दावा केला आहे.

वाल्मिक कराडला काही दिवसांपूर्वी पोटदुखीचा त्रास झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर दोन दिवस उपचार सुरु होते. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता वाल्मिक कराडच्या उपचाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे वाल्मिक कराड ज्या कारागृहात आहे, त्यावर प्रशासनावरही आता जितेंद्र आव्हाडांनी शंका उपस्थित केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांना वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“हॉस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे… वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा !!!”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

कृष्णा आंधळे फरार घोषित

दरम्यान संतोष देशमुख खूनाचा छडा लावण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे. सुरुवातीला हा तपास पोलीसच करत होते. पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली. तसेच हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. आता त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.