Jitendra Awhad|माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांची ट्वीट करून माहिती, नेमके कशामुळे आंदोलन?

Jitendra Awhad|माझ्या घरावर मोर्चा येणार; मंत्री आव्हाडांची ट्वीट करून माहिती, नेमके कशामुळे आंदोलन?
जितेंद्र आव्हाड

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी आरक्षणावर बोलताना आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत एक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 05, 2022 | 10:31 AM

ठाणेः माझ्या घरावर मोर्चा येणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वतः ट्वीट करून दिलीय. मात्र, हा मोर्चा कोण आणणार आहे, कशासाठी आंदोलन होणार आहे, याची उत्सुकता आता वाढली आहे. खरे तर मंत्री जितेंद्र आव्हाड कायम चर्चेत असतात. दोनच दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या वक्त्यव्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा मोर्चा त्याबाबत तर नसावा ना, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काय आहे आव्हाडांचे ट्वीट?

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे, असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे की तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शनजवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा…….जय भीम! असे अवघ्या तीन ओळीत त्यांनी माहिती दिली आहे. मात्र, मोर्चा कोण आणि कशासाठी काढणार आहे, याचा काहीही उल्लेख ट्वीटमध्ये नाही.

पोलीस बंदोबस्त तैनात

स्वतः मंत्री महोदयांनी ट्वीट करून ही माहिती दिल्यामुळे पोलीस सज्ज झाले आहेत. आव्हाडांच्या घरासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली आहे. यापूर्वी म्हाडा परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन केले होते. मात्र, आता सध्या आव्हाडांनी ओबीसी आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आहेत. त्यांच्यावर अनेकांनी टाकाही केली. त्याबद्दल तर हे आंदोलन नाही ना, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या कशामुळे वाद?

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी आरक्षणावर बोलताना आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत एक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. यावेळी आव्हाड म्हणाले होते की, ‘खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि ताता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कदाचित हे त्याच्यासाठीच आंदोलन होणार असल्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

Nashik Corona|नाशिकरांसाठी पुढचे 5 दिवस धोक्याचे…राज्याच्या आरोग्य सचिवांचा काय आहे इशारा?

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें